Solar Expressway: देशातील ‘हा’ आहे पहिला सोलर एक्सप्रेस वे! प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर 1 लाख घरांना मिळणार वीज, वाचा माहिती

सध्या उत्तर प्रदेश मध्ये पंधरा द्रूतगती महामार्ग असून त्यापैकी बुंदेलखंड द्रुतगती मार्ग हा अतिशय दुर्मिळ आणि इतर रस्त्यांपेक्षा वेगळा ठरणार आहे. कारण हा एक्सप्रेस वे उत्तर प्रदेश औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित केला जात असून हा सोलर एक्सप्रेस वे असणार आहे.

Ajay Patil
Published:

Solar Expressway:- भारतामध्ये पायाभूत सोयी सुविधा उभारण्याच्या दृष्टिकोनातून अनेक रस्ते प्रकल्पांचे काम सुरू असून जेव्हा हे प्रकल्प पूर्ण होतील व वाहतुकीसाठी खुले केले जातील तेव्हा भारतातील बहुतेक राज्य व महत्त्वाची शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारेलच व प्रवासाचा लागणारा वेळ देखील कमी होणार आहे तसेच कृषी व औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून देखील या रस्ते प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

तसेच या उभारल्या जाणाऱ्या सगळ्या रस्ते प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक अशा प्रकारचे तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळे अनेक नवनवीन सोवि सुविधा या एक्सप्रेस वेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतील.

याच पद्धतीने जर आपण उत्तर प्रदेश राज्याचा विचार केला तर या ठिकाणी अनेक हाईटेक असे एक्सप्रेसवे बांधले जात आहेत. सध्या उत्तर प्रदेश मध्ये पंधरा द्रूतगती महामार्ग असून त्यापैकी बुंदेलखंड द्रुतगती मार्ग हा अतिशय दुर्मिळ आणि इतर रस्त्यांपेक्षा वेगळा ठरणार आहे. कारण हा एक्सप्रेस वे उत्तर प्रदेश औद्योगिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित केला जात असून हा सोलर एक्सप्रेस वे असणार आहे.

 भारतातील पहिला सौर द्रुतगती मार्ग

296 किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सोलर पॅनल बसवण्यात येणार असून हा एक्सप्रेस वे देशातील पहिला सोलर एक्सप्रेस वे असणार आहे. जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा एक लाख घरांना या माध्यमातून वीज मिळणार आहे

हा एक्सप्रेस वे बुंदेलखंड एक्सप्रेस वे नावाने ओळखला जाणार असून हा यूपीच्या चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपुर,औरैया आणि इटावा या सात जिल्ह्यांमधून जाणार आहे.

हा एक्सप्रेस वे सोलर एक्सप्रेस वे करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून याकरिता टोरेंट पावर,टास्को, सोमाया सोलर सोल्युशन, अवधा एनर्जी तसेच आर्या वृंदावन पावर, आरीयश मोबिलिटी आणि महाप्रीत सारख्या आठ सौर ऊर्जा विकासकांनी याकरिता प्रेझेंटेशन सादर केलेले आहे.

 550 मेगा वॅट सौरऊर्जा तयार केली जाणार

बुंदेलखंड एक्सप्रेस वेवर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेल अंतर्गत सोलर प्लांट्स बसवले जाणार आहेत व या मार्गावरील मुख्य रस्ता आणि सर्विस लेनमधील जो काही पंधरा ते वीस मीटर रुंद पट्टीचा भाग आहे तो संपूर्ण एक्सप्रेस वे मध्ये रिकामा आहे. त्यामुळे या पट्ट्यावर सोलर पॅनल बसवले जाणार आहेत व त्या माध्यमातून 550 मेगावॅट सौरऊर्जा निर्माण केली जाणार आहे.

जेव्हा हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा हरित ऊर्जा विकसित केली जाणार असून या प्रकल्पामुळे पूर्वांचल, बुंदेलखंड तसेच लखनऊ, आग्रा आणि गोरखपुर द्रुतगती मार्गावर सोलर पॅनल प्रकल्पांची उभारणी केली जाणार असून त्या माध्यमातून वार्षिक ऊर्जा वापरावर सहा कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

त्याकरिता हा प्रकल्प उभारण्यासाठी बुंदेलखंड द्रूतगती मार्ग सर्वात योग्य राहणार आहे. तसेच या मार्गावर दोन औद्योगिक कॉरिडॉर स्थापन करण्यासाठी देखील एक मोठा बजेट योजना तयार केले जाणार आहे व यातील पहिला कॉरिडोर जालौन आणि दुसरा बांदा येथे विकसित केला जाणार असून याकरिता उत्तर प्रदेश सरकारने 3 हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे.

 बुंदेलखंड एक्सप्रेस वे उभारण्यासाठी 14850 कोटी रुपये खर्च

उत्तर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून हा २९६ किमीचा चौपदरी बुंदेलखंड एक्सप्रेस वे उभारला जाणारा असून यावर 14850 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत व भविष्यात तो सहा लेनपर्यंत विकसित केला जाऊ शकतो.

हा एक्सप्रेस वे चित्रकूट जिल्ह्यातील भरतकुप जवळील गोंडा गावातील राष्ट्रीय महामार्ग 35 पासून इटावा मधील कुद्रेल गावापर्यंत विस्तारतो व त्या ठिकाणी तो आगरा लखनऊ एक्सप्रेस वेला मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe