अनुदान घ्या आणि ही एकच गोष्ट करा! विज बिलापासून मिळवा आयुष्यभर मुक्तता, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वाढती महागाई आणि त्या मानाने घटते आर्थिक उत्पन्न यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत. महागाईने जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये डोके वर काढले असून अनेक जीवनावश्यक आणि महत्त्वाच्या गोष्टी देखील प्रचंड प्रमाणात महाग झालेले आहेत. अगदी तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर असो किंवा खाद्यतेल इतर आवश्यक गोष्टींची महागाई आता गगनाला पोहोचलेली आहे.

या महागाईचा भस्मासुराने विजेला देखील सोडलेले नाही. विजेचे दर देखील बऱ्याच प्रमाणात वाढल्यामुळे आता वाढीव वीज बिलाचा भार नागरिकांना सहन करावा लागतो. त्या दृष्टिकोनातून सौर ऊर्जेचा वापर हा वीजबचत आणि विजदरांचा बसणारा आर्थिक फटका या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरू शकतो. सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याकरिता आता केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकार यांच्या देखील वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असून त्या माध्यमातून अनुदानाचा लाभ दिला जातो.

यामधीलच एक महत्त्वाची योजना जर आपण पाहिली तर ती म्हणजे सोलर रूफ टॉप योजना ही होय. या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याकरिता अनुदान दिले जाते. याच दृष्टिकोनातून सोलर पॅनलचे महत्त्व काय आहे? इत्यादीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 सौर पॅनलची किंमत आणि अनुदान

सोलर रूफ टॉप योजनेच्या माध्यमातून सरकार लोकांना सोलर पॅनल बसवण्याकरिता सबसिडी देते. एकदा तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवले तर तुम्हाला वीस वर्षांपर्यंत मोफत वीज या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर सोलर रूफ टॉप योजना ही नागरिकांसाठी फायद्याची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही सौर पॅनल बसवले तर तुमचा विजेचा वापर कमी होण्यास मदत होणार असून या माध्यमातून तुम्ही सहजपणे वीज निर्मिती करू शकणार आहात.

तसेच तुमची स्वतःच्या घराची विजेची गरज पूर्ण करून तुम्ही जास्तीची वीज उत्पादन करत असाल तर ती सरकारला विकून अधिकची कमाई देखील करू शकणार आहात.अशा पद्धतीने तुम्ही या योजनेच्या माध्यमातून अनुदानावर घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून वीज तयार करून वीज बिलापासून मुक्तता मिळवू शकता.

 सोलर रूफ टॉप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत

याकरिता सर्वात अगोदर तुम्हाला सरकारची अधिकृत वेबसाईट https://solarrooftop.gov.in/ ला भेट देणे गरजेचे आहे. त्यानंतर या ठिकाणी अप्लाय फॉर सोलर रूफटॉप या पर्यायावर क्लिक करावे लागेल व त्या ठिकाणी तुमचे राज्य निवडून आवश्यक बाबी भरून तुम्ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरणे गरजेचे असून ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. नंतर तुम्ही जो काही अर्ज सादर करतात त्या अर्जाचे पुनरावलोकन केले जाईल आणि सर्व माहिती योग्य आणि पूर्ण असल्यास अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाते.