Soyabean Price : सोयाबीन दरात तूर्तास स्थिरता ; पण लवकरच ‘इतके’ वाढणार दर, वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Price : गेल्या दीड ते दोन महिन्यापासून सोयाबीन दरात कमालीची स्थिरता पाहायला मिळत आहे. सोयाबीन दर साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास स्थिरावले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव दरवाढ होईल की नाही याबाबत संभ्रमाअवस्थेत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान चीनकडून सोयाबीनची मागणी वाढत असल्याने तसेच प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र अर्थातच अर्जेंटिनामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती तयार झाली असल्याने भविष्यात सोयाबीन दरवाढीसाठी पूरक परिस्थिती निर्माण होत असून याचा देशांतर्गत सोयाबीन बाजारावर सकारात्मक असा परिणाम पाहायला मिळेल आणि लवकरच देशांतर्गत बाजारात सोयाबीन दर वधारतील असा अंदाज काही तज्ञांकडून वर्तवला जात आहे.

तज्ञांच्या मते सोयाबीन दरात येत्या काही दिवसात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ नमूद केली जाऊ शकते. जर असं झालं तर निश्चितच सोयाबीन उत्पादकांना फायदा होणार आहे. तूर्तास सोयाबीन दर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास पाहायाला मिळत आहेत.

दरम्यान आज राज्यातील बहुतांशी एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी सरासरी दर नमूद करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय दर मिळाला याविषयी डिटेल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करनार आहोत. 

लासलगाव- विंचूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 400 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 3000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5450 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5050 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5410 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 150 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 600 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5393 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5146 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 3189 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 717 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5360 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5180 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 133 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5201 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5425 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5370 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

केज कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 225 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5275 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5400 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5360 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

बार्शी- टाकळी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 215 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5375 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 290 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.