यंदा सोयाबीनवर ‘या’ हानिकारक किटकाचा होऊ शकतो प्रादुर्भाव; किडीचा हल्ला झाला तर कस मिळवणार नियंत्रण? वाचा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Crop Management : सोयाबीन हे राज्यात उत्पादीत होणारे खरीप हंगामातील एक मुख्य पिक आहे. खरीप तसेच उन्हाळी हंगामात देखील या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते. उन्हाळी हंगामात प्रामुख्याने बीजोत्पादनासाठी सोयाबीनची लागवड केली जाते. दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामात देखील सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विषय उल्लेखनीय राहणार आहे.

काही तज्ञांनी जरी गेल्या हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाला नसल्याने या हंगामात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र घटणार असल्याचा दावा केला असला तरी देखील मराठवाडा, विदर्भ या प्रमुख सोयाबीन उत्पादक विभागात या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात फारशी घट होणार नसल्याचे सांगितले जात आहे. खरं पाहता, सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. तेलबिया पीक असल्याने बाजारात याला कायमच मोठी मागणी असते. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी गोड बातमी आली रे…! केंद्र सरकारने खरीपासाठी हमीभाव जाहीर केला; सोयाबीन, तूर, कापूस कोणत्या पिकाला किती हमीभाव? वाचा….

याला म्हणूनच नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. या नगदी पिकाची शेती शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरते. सोयाबीन हे एक शाश्वत उत्पादन देणारे पीक म्हणून ओळखले जाते. मात्र असे असले तरी सोयाबीन पिकामध्ये वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव पाहायाला मिळतो.

यामुळे पीक उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त केली जाते. सोयाबीन मध्ये चक्रीभुंगा नामक कीटकाचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. या कीटकामुळे जवळपास पीक उत्पादनात 30 टक्क्यांपर्यंतची घट होऊ शकते असा दावा काही तज्ञ करतात.

यामुळे या कीटकावर वेळीच नियंत्रण मिळवणे अतिशय आवश्यक बाब आहे. अशा परिस्थितीत आज आपण चक्रीभुंगा कीटकावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते या संदर्भात आवश्यक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- खुशखबर ! मान्सून येत्या काही तासात केरळमध्ये दाखल होणार, महाराष्ट्रात केव्हा? मान्सूनबाबत हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

कस करणार चक्रीभंगा किड नियंत्रण

या कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पेरणीचा टाइमिंग साधने अतिशय आवश्यक आहे. कृषी तज्ञ सांगतात की या कीटकाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सोयाबीनची पेरणी ही 15 जुलैच्या आत करणे जरुरीचे आहे.

पेरणीसाठी योग्य प्रमाणात बियाणे वापरावे. दाट पेरणी करू नये. दाट पेरणी केल्यास या कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो.

ज्या क्षेत्रात चक्रीभुंगा कीटकाचा सातत्याने प्रादुर्भाव पाहायला मिळतो अशा क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्याचा निर्णय घेतला असेल तर फोरेट (दाणेदार) १० टक्के १० किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना टाकावे.

चक्री भुंगा किटकामुळे पिकाची पाने फांद्या वाळतात. यामुळे या किडीने ग्रस्त झालेले झाडे, पाने, फांद्या नष्ट कराव्यात. तसेच या किडीने ग्रस्त असलेले सोयाबीनचे झाडे उपटून बाजूला करावेत. तसेच किडीने ग्रस्त असलेल्या झाडांमध्ये असलेले कीटक समूळ नष्ट करावेत.

हे पण वाचा :- पाऊस आला रे…! अहमदनगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरसह ‘त्या’ भागात 9 जूनपासून तीन दिवस पावसाची शक्यता

या किडीने अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच निंबोळी अर्काची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

या कीटकाच्या नियंत्रणासाठी पीक पेरणीच्या ३०-३५ दिवसांनतर प्रादुर्भाव दिसताच ७-१० दिवसात ट्रायझोफॉस ४० ई. सी. १६ मिली प्रति १० लिटर पाणी अथवा थायक्लोप्रीड २१.७ एस. सी. १५ मिली प्रति १० लिटर अथवा क्लोरांट्रनिलीप्रोल १८.५ एस. सी. ३ मिली मिली प्रति १० लिटर अथवा थायमेथोक्झाम १२.६ टक्के आधिक लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ९.५ टक्के  झेड. सी २.५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

शेतकरी मित्रांनो, कोणत्याही औषधाचे फवारणी करण्यापूर्वी मात्र कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालकाचा सल्ला घेणे आवश्यक राहणार आहे.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी ! पालखी सोहळ्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीत झाला मोठा बदल, कसा असेल बदल? वाचा