Soybean Crop Management: तुमच्याही शेतात सोयाबीन पिवळे पडत आहे का? या फवारण्या करा, पिकात होईल सुधारणा

Ajay Patil
Published:

Soybean Crop Management:- सध्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनची लागवड महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये जवळजवळ पूर्ण झाली असून काही ठिकाणी सोयाबीन पेरणी होऊन 15 ते 30 दिवसांचा कालावधी लोटला आहे. परंतु या कालावधीमध्ये सोयाबीनवर ज्या काही प्रमुख समस्या उद्भवतात त्यामध्ये सोयाबीन पिवळे पडण्याची समस्या ही खास करून आपल्याला दिसून येते.

तसे पाहायला गेले तर सोयाबीन पिवळे पडण्यामागे अनेक कारणे आपल्याला दिसून येतात. यामध्ये प्रमुख कारण जर पाहिले तर अन्नद्रव्याची कमतरता किंवा काही रोगांचा प्रादुर्भाव ही कारणे देखील त्यामध्ये असू शकतात. कारण या कालावधीमध्ये सोयाबीन पिवळे पडण्याची समस्या प्रामुख्याने अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येते.

चुनखडीयुक्त जमीन असेल तर त्यामध्ये अन्नद्रव्यांचे शोषण होत नसल्यामुळे देखील सोयाबीन पिवळे पडते. तसेच जमिनीमध्ये जर गंधक तसेच जस्त आणि लोहाचे कमतरता असेल तरी सोयाबीन पीक पिवळे पडू शकते. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असल्यामुळे देखील सोयाबीन पिवळे पडते. अशाप्रकारे एक नाहीतर आणि कारणे यामध्ये असू शकतात. त्यामुळे कारण शोधून त्यावर त्या पद्धतीने उपाययोजना करणे गरजेचे असते.

यामागे जर अन्नद्रव्यांची कमतरता असेल तर मात्र जमिनीचा पोत सुधारणे खूप गरजेचे असते व याकरता पेरणी करण्याअगोदर व पेरणी करताना सेंद्रिय खतांचा योग्य वापर करणे व त्यासोबत इतर उपाययोजना खूप गरजेचे असतात. त्यामुळे पुढे दिलेल्या ज्या काही उपाय योजना आहेत त्या जर केला तर बऱ्यापैकी फरक पडतो.

 सोयाबीन पिवळे पडत असेल तर ही विद्राव्य खताची फवारणी घ्या( प्रमाण प्रतिलिटर पाणी)

1- मुख्य अन्नद्रव्याच्या कमतरतेमध्ये जर तुम्हाला नत्राची कमतरता दिसून येत असेल तर युरिया 20 ग्रॅम

2- गंधकाची कमतरता दिसून येत असेल तर सल्फेट युक्त खत पाच मिली

3- लोह अन्नद्रव्याचे कमतरता दिसून येत असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्य दोन( मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड 2) पाच मिली किंवा चिलेटेड फेरस 5g

4- जस्ताची कमतरता असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्य दोन( मायक्रो न्यूट्रिएंट ग्रेड दोन), पाच मिली किंवा चिलेटेड झिंक पाच ग्राम

5- स्फुरद या मुख्य अन्नद्रव्याचे कमतरता दिसून येत असेल तर 12:61:0 किंवा 0:52:34 ही खते पाच ग्रॅम

6- बोरॉनची कमतरता दिसत असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्य( मायक्रो न्यूट्रिएंट ग्रेड 2) पाच मिली

यामध्ये तुम्हाला कुठल्या अन्नद्रव्याचे कमतरता लक्षात येत नसेल तर अशावेळी 19:19:19 एकच १०० ग्रॅम किंवा अमोनियम सल्फेट 20 ते 25 ग्रॅम किंवा झिंक चिलेटेड 25 ग्रॅम किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य पंचवीस मिली अधिक त्यामध्ये अमिनो ऍसिड एकत्र घेऊन फवारणी करावी.

 ही खते जमिनीतून द्या

या शिवाय तुम्ही 10:26:26 एकरी वीस किलो अधिक कमतरतेनुसार झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट पाच किलो

 किंवा

सूक्ष्म अन्नद्रव्य दोन( मायक्रो न्यूट्रियंट ग्रेड दोन) दाणेदार पाच किलो अधिक अमोनियम सल्फेट 15 ते 20 किलो अशा प्रकारे जमिनीतून खते द्यावीत व खते देताना मात्र जमिनीमध्ये पुरेसा ओलावा आहे की नाही याची खात्री करावी व यामध्ये ओलावा असणे खूप गरजेचे आहे.

याबद्दलची अधिकची माहिती कृषी तज्ञांकडून घेऊन तुम्ही त्या पद्धतीने देखील उपाययोजना करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe