कौतुकास्पद ! ‘या’ मराठमोळ्या शेतकऱ्याने सोयाबीनपासून अशा पद्धतीने तयार केले गुलाबजामून अन पनीर, आता कमवतोय लाखो

Soybean Farmer Success Story : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक. या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात शेती केली जाते. शाश्वतं उत्पन्न देणारे नगदी पीक म्हणून या पिकाकडे बघितलं जात पण अलीकडे शासनाच्या उदासीन धोरणामुळे, सोयाबीन प्रक्रिया उद्योगाच्या लॉबीमुळे सोयाबीनला खूपच नगण्य दर मिळत आहे. यंदा तर परिस्थिती एवढी भयावय बनली आहे की सोयाबीन पिकासाठी झालेला खर्च देखील बाजारात सोयाबीन विक्री करून निघणार नसल्याचे चित्र आहे.

सद्यस्थितीला सोयाबीन बाजारात 5200 ते 5500 दरम्यान विक्री होत आहे. निश्चितच हा भाव हमीभावापेक्षा अधिक भासत असला तरी देखील पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनात आलेली घट भरून काढण्यासाठी हा भाव पुरेसा नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सोयाबीनला कमी भाव मिळाला म्हणून एका प्रयोगशील शेतकऱ्याने सोयाबीनपासून गुलाबजामून आणि पनीर बनवून चांगली कमाई केली आहे. शिवाय या प्रयोगशील शेतकऱ्याने इतरांसाठी एक मोठा आदर्श रोवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील कवडा गावातील शेतकरी निरंजन कुटे यांनी ही किमया साधली आहे. यामुळे सध्या निरंजन रावाची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे. खरं पाहता निरंजन गेल्या अनेक वर्षांपासून सोयाबीनची शेती करत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन मोठ्या प्रमाणात उत्पादित होतं. मात्र यंदा सोयाबीनला कमी दर मिळाला असल्याने निरंजन यांनी सोयाबीनवर प्रक्रिया करून गुलाबजामून आणि पनीर बनवले आहे. दरम्यान त्यांनी तयार केलेल्या पनीरला अडीचशे रुपये प्रति किलो आणि गुलाबजामुनला दोनशे रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. यामुळे त्यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

निरंजन कुटे यांनी आपल्या एक एकर शेतजमीनीत पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून 11 क्विंटल एवढे सोयाबीन उत्पादन यंदा घेतल. निश्चितचं अतिवृष्टीचा सामना करत मिळवलेल हे उत्पादन कौतुकास्पद आहे. विक्रमी उत्पादन मिळालं असलं तरी देखील बाजारात नगन्य दर असल्याने त्यांची कोंडी होणार होती.

त्यामुळे त्यांनी सोयाबीन साठवणुकीचा निर्णय घेतला. दरम्यान पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सोयाबीन प्रक्रियावर त्यांनी प्रशिक्षण घेतले. यादरम्यान त्यांना आपण घरी साठवून ठेवलेल्या सोयाबीनवर प्रक्रिया करून बाजारात विक्री करावी अशी कल्पना सुचली. यामुळे त्यांनी आपल्या सोयाबीनवर प्रक्रिया करत गुलाब जामुन आणि पनीरची निर्मिती केली.

अशा पद्धतीने तयार केले गुलाबजामून

खरं पाहता सोयाबीन पासून गुलाब जामुन तयार करण्याचा हा प्रयोग त्यांच्यासाठी नवखा असला तरी देखील त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं. गुलाब जामुन तयार करण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी आपल सोयाबीन दळून घेतले. मग हे दळलेले सोयाबीन एका भांड्यात घेऊन पीठ मळतात तसे मिळून घेतले. त्यानंतर साखरेसह चवीसाठी इतर आवश्यक वस्तू त्यामध्ये मिसळल्या. मग या मिश्रणाचे गोळे तयार केले. आणि मग साखरेच्या पाकात हे गोळे टाकले आणि या पद्धतीने मग सोयाबीनपासून गुलाब जामून तयार झालेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक किलो सोयाबीन पासून दीड ते दोन किलो पर्यंत गुलाबजाम बनवू शकतो. दोनशे रुपये प्रति किलोपर्यंत हे गुलाबजाम बाजारात सहजरीत्या विक्री होऊ शकतात असे देखील सांगितले गेले आहे.

अशा पद्धतीने तयार केले सोयाबीन पासून पनीर

सोयाबीन पासून पनीर तयार करण्यासाठी सर्वप्रथम दूध तयार कराव लागत. यासाठी सोयाबीन रात्रभर भिजवावे लागतात. यानंतर मग भिजवलेले सोयाबीन मिक्सरमधून बारीक करून घ्यावे लागते. हे बारीक केलेले मिश्रण चाळणीच्या माध्यमातून चाळून घ्यावे लागते. कापडाच्या सहाय्याने चाळणी केल्यास व्यवस्थितपणे या मिश्रणाची चाळण होत असते. अशा पद्धतीने मग सोयाबीनचे दूध तयार होते. मग हे दूध चुलीवर गरम करण्यासाठी ठेवलं जातं. या उकळलेल्या दुधात मग लिंबाचा रस टाकला जातो. मग यापासून पनीरची निर्मिती होत असते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक किलो दुधापासून 200 ग्रॅम पनीरची निर्मिती सहजरीत्या होते. या पनीरला बाजारात 250 रुपये प्रति किलो पर्यंतची मागणी असते. निश्चितच निरंजन कुटे यांचा हा प्रयोग सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मार्गदर्शक प्रयोग राहणार आहे.