सोयाबीन पेरणी करताय ? मग हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सुचवलेल्या ‘या’ वाणाची लागवड करा, उत्पादनात होणार मोठी वाढ, वाचा….


जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी सोयाबीनच्या सुधारित वाणाची पेरणी केली पाहिजे असा सल्ला दिला आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Farming : महाराष्ट्रासह भारताच्या मुख्य भूमीवर अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. म्हणून खरीप हंगामाची सुरुवात धामधूडाक्यात झाली नसली तरीही दबक्या पावलात खरीपासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी जमिनीची मशागतीची सर्व कामे उरकून घेतली आहेत. पीक पेरणीसाठी वावरदेखील तयार झाले आहे.

आता आतुरता लागली आहे ती मान्सूनच्या पावसाची. दरम्यान भारतीय हवामान विभागाने येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन होईल आणि पावसाला सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान तज्ञ पंजाब डख यांनी देखील राज्यात आठ जून पासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज बांधला आहे.

यामुळे राज्यात लवकरच पीक पेरणीला सुरुवात होणार असे चित्र आहे. साधारणता एक वितभर म्हणजे साधारणता सहा ते सात इंच जमिनीत ओल गेली तर शेतकरी बांधव सोयाबीन समवेतच खरीप हंगामातील मुख्य पिकाच्या पेरणीसाठी पुढे सरसावणार आहेत. 

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, सोयाबीन पेरणी करतांना ‘अशी’ जमीन असेल तर विशेष काळजी घ्या ! पहा काय म्हणताय तज्ञ

अशातच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांनी यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी सोयाबीनच्या सुधारित वाणाची पेरणी केली पाहिजे असा सल्ला दिला आहे. सोबतच त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या काही प्रमुख जाती देखील सुचवल्या आहेत.

खरंतर सोयाबीन हे एक मुख्य कॅश क्रॉप आणि तेलबिया पीक म्हणून ओळखले जाते. यामुळे बाजारात सोयाबीनला कायमच चांगला दर मिळाला आहे. शिवाय सोयाबीन हे एक शाश्वत उत्पादन देणारे पीक आहे. यामुळे शेतकऱ्यांना या पिकातून चांगले उत्पन्न मिळते यात शंका नाही.

मात्र या पिकातून चांगले उत्पादन मिळवण्यासाठी सोयाबीनच्या सुधारित जातींचीच पेरणी केली पाहिजे. अशा परिस्थितीत आज आपण पंजाब डख यांनी सुचवलेल्या सोयाबीन वाणाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; तूर पिकाला ‘या’ खतांची मात्रा द्या, हेक्टरी 40 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळवा

या जातींची करा लागवड

MAUS 612 :- हवामान तज्ञ पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना या जातीची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे. हे वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी प्रसारित केलेले आहे. हे वाण पेरणी केल्यानंतर साधारणतः 95 ते 98 दिवसात तयार होते. हा वाण कमी ओलाव्यास व शेंगा तडकण्यास सहनशील आहे. सोबतच या जातीचे सोयाबीन पीक विविध रोगांस लढण्यास सक्षम आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे अतिवृष्टी मध्ये देखील या जातीच्या शेंगा तडकत नाहीत. सलग पंधरा दिवस पाऊस झाला तरी देखील या जातीच्या शेंगा तडकणार नाहीत, असं डख यांनी देखील नमूद केल आहे.

फुले कीमया :- राहुरी विद्यापीठाने प्रसारित केलेल्या या वाणाची लागवड करण्याचा सल्ला हवामान तज्ञ पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. हा वाण महाराष्ट्र व्यतिरिक्त तेलंगाना, आंध्र प्रदेश, तमिळनाडू यांसारख्या इतर राज्यासाठी देखील शिफारशीत करण्यात आला आहे. या जातीचा पीक परिपक्व कालावधी हा साधारणता 95 ते 100 दिवस इतका आहे. या जातीची एक मोठी विशेषता म्हणजे या जातीचे पीक तांबेरा रोगास कमी प्रमाणात बळी पडते. या जातीपासून हेक्‍टरी 25 ते 30 क्विंटल चा उतारा मिळत असल्याचा दावा काही शेतकऱ्यांनी केला आहे. निश्चितच 

हे पण वाचा :- पंजाब डख : अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात ‘या’ दिवशी मुसळधार पाऊस पडणार ! मान्सून आगमन लांबणार ? पहा….

या जातीची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर राहणारी आहे.

फुले संगम :- हवामान तज्ञ पंजाब डख यांनी फुले संगम या वाणाची लागवड करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे. काही कृषी तज्ञांनी मात्र शेतकरी बांधवांना केवळ फुले संगम या एका वाणाची लागवड करण्याऐवजी फुले संगम आणि फुले किमया किंवा इतर सुधारित वाणाची वेगवेगळ्या क्षेत्रावर लागवड केली पाहिजे असा सल्ला दिला आहे. म्हणजे एका तुकड्यात फुले संगम लावले असेल तर दुसऱ्या तुकड्यात फुले किमया लावले जाऊ शकते. दरम्यान फुले संगम या वाणाबाबत बोलायचं झालं तर ही जात देखील राहुरी विद्यापीठाने प्रसारित केली आहे. महाराष्ट्रात या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. हा वाण साधारणतः 100 ते 105 दिवसात काढणीसाठी तयार होतो. ही जात देखील फुले किमयाप्रमाणेच तांबेरा रोगास कमी प्रमाणात बळी पडते. या जातीपासून साधारणता प्रतिहेक्टर 23 ते 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! त्रिस्तरीय समितीचा अहवाल सरकारकडे जमा; जुनी पेन्शन योजना लागू होणार की नाही? सरकार केव्हा घेणार निर्णय?