Soybean Market : अर्जेंटिनामध्ये असं घडतंय म्हणून सोयाबीन दरात होतेय चढ-उतार ; पण भविष्यात सोयाबीनला ‘इतका’ दर मिळणार, तज्ञांच भाकीत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market : सोयाबीन ही एक जागतिक कमोडिटी आहे. यामुळे सोयाबीन दरावर जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींचा मोठा फरक हा पडत असतो. जागतिक सोयाबीन उत्पादन, प्रमुख सोयाबीन ग्राहक असलेल्या देशातून सोयाबीनची मागणी, प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रात सोयाबीनचे मिळणारे उत्पादन, जागतिक बाजारात सोयाबीनला मिळत असलेला दर, सोयापेंड दर, सोयातेलाचे दर, सोयाबीनची होणारी आयात-निर्यात, सोयापेंडची होणारी आयात-निर्यात, खाद्यतेल दराची स्थिती तसेच त्यांची आयात निर्यात यांसारख्या एक ना अनेक बाबींवर देशांतर्गत सोयाबीन बाजारामधील दर ठरत असतात.

अशातच अर्जेंटिना जे की प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र आहे त्या ठिकाणी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे दर वाढले आहेत. मात्र या गेल्या आठवड्यात अर्जेंटिना मध्ये प्रमुख सोयाबीन उत्पादक प्रांतात पाऊस झाला. त्या ठिकाणी सध्या स्थितीला सोयाबीनचे पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे यामुळे या पावसाचा सोयाबीन पिकावर त्या ठिकाणी चांगला प्रभाव पडणार आहे.

मात्र जाणकार लोकांनी तरीही अर्जंटीनामध्ये सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार असल्याचा अंदाज कायम ठेवला आहे. उत्पादनात घट होण्याचा अंदाज कायम असला तरी देखील त्या ठिकाणी झालेल्या पावसामुळे सध्या स्थितीला जागतिक बाजारातील सोयाबीन दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान अर्जेंटिनामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घटणार असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड आणि सोयाबीन तेजीत आहे.

दरम्यान ही तेजी टाईम राहणार असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे. मागील चार दिवसात अर्जंटीना मध्ये जरी पाऊस पडला असला तरी देखील या पावसाचा सोयाबीन पिकाला आधार मिळणार नसून सोयाबीनच्या उत्पादनात घटच होईल असे काही जाणकार नमूद करत आहेत. निश्चितच अर्जेंटिना हा सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर येत असल्याने त्या ठिकाणी उत्पादनात घट होणार असल्याने सोयाबीन आणि सोयापेंड दर तेजीत राहतील.

याचा देशांतर्गत बाजारात देखील प्रभाव राहील आणि दरात वाढ होईल अशी आशा तज्ञ लोकांनी व्यक्त केली आहे. सद्यस्थितीला बाजारात मात्र सोयाबीन दर दबावात आहेत. सध्या सोयाबीनचे सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमीच आहेत. शेतकऱ्यांना यामध्ये वाढ होण्याची आशा आहे. जाणकार लोकांनी मात्र 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर या हंगामात सोयाबीनला मिळू शकतो अशी शक्यता वर्तवली आहे. यामुळे आता भविष्यात देशांतर्गत सोयाबीनला काय भाव मिळतो याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे.