सोयाबीनच्या उच्च उत्पादन देणाऱ्या जाती कोणत्या आणि त्यांच्या विशेषता, पहा…


सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक राहणार आहे. जर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या चांगली व्हरायटी लावली तर त्यांना निश्चितच चांगले उत्पादन मिळणार आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Variety : सोयाबीन हे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. या व्यतिरिक्त देशातील इतरही राज्यात पिवळं सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. खरंतर, सोयाबीनला शेतकरी पिवळ सोन म्हणून संबोधतात.

याचं कारण म्हणजे सोयाबीनच्या शेतीतून शेतकऱ्यांना शास्वत उत्पादन मिळते. नगदी पीक असल्याने या पिकाच्या शेतीतून दोन पैसा अधिक मिळतो म्हणून राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

आपल्याकडे प्रामुख्याने खरीप हंगामात सोयाबीन पिकाची शेती होते. पण यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने सोयाबीनच्या पेरण्या काही ठिकाणी लांबणार आहेत. यामुळे सोयाबीन पेरणी करताना शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या सुधारित जातींची लागवड करणे आवश्यक राहणार आहे. जर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या चांगली व्हरायटी लावली तर त्यांना निश्चितच चांगले उत्पादन मिळणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीनच्या सुधारित जातींची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- पुण्यातून महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी भारत गौरव रेल्वे ‘या’ तारखेला होणार रवाना; कोणत्या तीर्थक्षेत्रांना देणार भेट, पहा संपूर्ण रूटमॅप

बीएस ६१२४ :- ही सोयाबीनची एक सुधारित जात म्हणून ओळखली जाते. या जातीबद्दल बोलायचे झाले तर या जातीचे सोयाबीन पेरणीसाठी एकरी 35-40 किलो बियाणे पुरेसे असते. तसेच या जातीपासून एक हेक्टरमध्ये सुमारे 20-25 क्विंटल उत्पादन मिळू शकते. या जातीपासून सोयाबीनचे पीक ९० ते ९५ दिवसांत तयार होते. म्हणजे साधारणता तीन महिन्यांच्या काळात या जातीचे पीक काढण्यासाठी तयार होते.

JS 2069 :- सोयाबीनची ही एक सुधारित जात म्हणून संपूर्ण देशभरात शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय बनली आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी या जातीच्या पेरणीस पसंती दाखवतात. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, या जातीची पेरणी 15 जून ते 22 जून या कालावधीत केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन या ठिकाणी मिळू शकते. या जातीच्या पेरणीसाठी एकरी ४० किलो बियाणे लागते. या जातीपासून सुमारे 22-26 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला असून या जातीचे पीक साधारणता 85 ते 86 दिवसात परिपक्व बनते. अर्थातच तीन महिन्यांपेक्षा कमी काळात या जातीचे पीक तयार होते.

MACS 1407 :- सोयाबीनची ही व्हरायटी देखील अलीकडील काही वर्षात शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनली आहे. ही जात आसाम, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये लागवडीसाठी योग्य आहे. अर्थातच आपल्या राज्यात या जातीची लागवड करता येत नाही. मात्र ईशान्येकडील राज्यासाठी ही जात योग्य असून या जातीपासून तेथील शेतकऱ्यांना जवळपास 39 क्विंटलपर्यंतच हेक्टरी उत्पादन मिळत आहे. 

हे पण वाचा :- दिल्ली-मुंबई ते मुंबई-पुणे….; महाराष्ट्रात तयार होतायेत तब्बल 14 नवीन महामार्ग, पहा यादी

JS 2034 :- देशातील विविध जातींपैकी ही एक सोयाबीनची सुधारित व्हरायटी आहे. सोयाबीनच्या या जातीबद्दल सांगायचे तर, सोयाबीनच्या या जातीमध्ये धान्याचा रंग पिवळा, फुलांचा रंग पांढरा आणि शेंगा सपाट असतात. ही जात कमी पाऊस असतानाही चांगले उत्पादन देते. यंदा अनेक हवामान संस्थांनी पावसाळ्यात पाऊसमान कमी राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत या जातीची पेरणी यंदा शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र कोणत्याही जातीची निवड करताना शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा मगदूर आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच जातीची निवड करणे अनिवार्य आहे. जमिनीच्या मगदूराप्रमाणे अर्थातच जमीन मध्यम आहे की भारी आहे हे जाणून सोयाबीनच्या जातीची निवड केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन या ठिकाणी भेटू शकते. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या जातीचे पीक जवळपास 80 ते 85 दिवसात परिपक्व बनते आणि हेक्टरी 24 ते 25 क्विंटल पर्यंतचे उत्पादन या जातीपासून शेतकऱ्यांना मिळू शकते. पेरणीसाठी साधारणतः 34 ते 35 किलो प्रति एकर बियाणं आवश्यक असतं.

फुले संगम/केडीएस ७२६ :- हा सोयाबीन वाण महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या जातीबद्दल बोलायचे झाले तर, फुले संगम केडीएस ७२६ ही सोयाबीनची एक प्रगत जात असून महाराष्ट्रासाठी शिफारशीत आहे. ही जात मध्यम ते भारी जमिनीत लावली जाते. ही जात देशातील अग्रगण्य कृषी विद्यापीठापैकी एक असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. ही जात विद्यापीठाच्या माध्यमातून सन २०१६ मध्ये शिफारस करण्यात आली आहे. या जातीचे सोयाबीन पिक हे इतर जातीपेक्षा मोठे आणि मजबूत असते. या जातीपासून हेक्‍टरी 35 ते 45 क्विंटल पर्यंतचे उत्पादन शेतकऱ्यांना सहजतेने मिळत आहे. शिवाय महाराष्ट्रातील हवामान या जातीसाठी पूरक असल्याने राज्यातील बहुतांश सोयाबीन उत्पादक जिल्ह्यामध्ये याच जातीची लागवड पाहायला मिळते.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो तयारीला लागा ! आजपासून ‘इतके’ दिवस महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यात बरसणार पावसाच्या धारा, तुमच्याकडे पाऊस आहे की नाही? वाचा….