महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के तिकीट सवलत लागू; पण ‘या’ महिलांना मिळणार नाही याचा लाभ, वाचा याविषयी सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST Bus Half ticket for Woman In Maharashtra : अर्थसंकल्प 2023-24 मध्ये शिंदे फडणवीस सरकारने महिला शेतकरी कामगार कर्मचारी विद्यार्थी यांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. प्रामुख्याने महिलांसाठी अर्थसंकल्पात विशेष योजना सुरू झाले आहेत. यामध्ये महिलांना 50 टक्के एसटीच्या तिकीट दरात सवलत देण्याची योजना देखील आहे. आता योजनेची शुक्रवारपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे.

या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली तरी देखील या योजनेबाबत अनेक आशंका महिलांकडून उपस्थित होत आहेत. दरम्यान आज आपण या योजनेचा संपूर्ण आढावा घेणार आहोत. नेमकी ही योजना कोणत्या महिलांना लागू असेल, या योजनेचा कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही? याबाबत आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! पालखी मार्गात होणार बदल? या एका कारणामुळे रूटमध्ये बदल होणार

योजनेचे स्वरूप थोडक्यात

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. महिलांना एसटी तिकीट दरात 50 टक्के सवलत मिळणार असल्याने या योजनेविषयी महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यामुळे महिलांचे आपल्या माहेरी ये जां वाढणार आहे. ही योजना एसटीच्या सर्व बसेस मध्ये लागू राहणार आहे. साहजिकच यामुळे महिलांचा एसटी प्रवास वाढेल आणि एसटीच्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे.

कोणत्या महिलांना अन कोणत्या प्रवासासाठी मिळणार लाभ

या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व एसटी बसेस मध्ये महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत राहणार आहे. मात्र राज्याच्या बाहेर एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांना याचा फायदा मिळणार नाही. यासोबतच एसटी बस मधून प्रवास करताना एका वेळी एकाच सवलतीचा लाभ मिळणार आहे. अशा परिस्थितीत पास धारक विद्यार्थींना कोणत्यातरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्थातच विद्यार्थ्यांना मासिक, त्रैमासिक, सहामाही पास आणि 50% सवलत यापैकी एकाचाच लाभ घेता येणार आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! केंद्र सरकार 20 लाख लोकांना देणार रोजगार, महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न होणार दूर; पहा केंद्राची भन्नाट योजना आहे तरी नेमकी काय?

या सोबतच दिव्यांग प्रवाशांना देखील 75 टक्के सवलत असते अशा परिस्थितीत ज्या दिव्यांग महिला प्रवासी असतील त्यांना एसटीच्या या 50 टक्के सवलतीचा लाभ मिळणार नाही. अशा प्रवाशांना 75% आधीचीच सवलत अनुज्ञेय राहील. तसेच साडे तीन ते बारा वर्षे वयोगटातील मुलींना महिला सन्मान योजनेंतर्गत अतिरिक्त 50 टक्के सवलत देण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, शासनाने सुरू केलेली ही योजना बृहन्मुंबई ट्रान्सपोर्ट कार्पोरेशनच्या बससेवेसाठी देखील लागू राहणार आहे. पण रत्नागिरी व सांगली एसटी आगारामार्फत सुरू असलेल्या शहर वाहतूक (सिटी बस) मधील सेवेला 50 टक्के सवलत लागू राहणार नाही. याशिवाय, आवडेल तेथे प्रवास या योजनेतील पास सवलतीच्या दरानेच देण्यात येतात अशा परिस्थितीत या योजनेला देखील याची सवलत मिळणार नाही.

निश्चितच या योजनेअंतर्गत ज्या महिलांना आधीच इतर सवलती मिळत आहेत अशा महिलांना या नवीन सवलतीचा लाभ मिळणार नाही. तर विद्यार्थींना पासची सवलत किंवा 50% तिकीट दराची सवलत यापैकी कोणती तरी एक सवलत अनुज्ञय राहणार आहे.

हे पण वाचा :- बीडच्या शेतकऱ्याचा परफेक्ट कार्यक्रम! ‘या’ जातीच्या दोडक्याची अर्धा एकरावर लागवड केली, तब्बल अडीच लाखांची कमाई झाली, पहा कसं होत नियोजन?