St Employee News : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; ‘त्या’ एसटी कर्मचाऱ्यांना मिळाला दिलासा, पहा काय आहे नेमका माजरा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

St Employee News : एसटी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जस की आपणास ठाऊकच आहे गेल्यावर्षी राज्य कर्मचाऱ्यांनी सहा महिने संप पुकारला होता. या संप काळात या एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती. अनेकांना आर्थिक अडचणींमुळे आपला संसाराचा गाडा हाकताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. विशेष म्हणजे या संप काळात 124 कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झाला होता. आर्थिक अडचणींमुळे संप काळात 124 हून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली होती.

दरम्यान आता या आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांबाबत शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या संप काळात आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना आता नोकरी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी देण्याचा हा राज्य शासनाचा निर्णय निश्चितच त्या कर्मचाऱ्यांच्या वारसांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी दिलासा देणारा राहणार आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, 27 ऑक्टोबर 2021 पासून राज्य कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. हा संप मुंबईच्या आझाद मैदानावर जवळपास सहा महिने सुरू होता. हा संप महामंडळाचे शासनात विलीनीकरण केले जावे या प्रमुख मागणीसाठी करण्यात आला होता. त्यावेळी हा संप महामंडळाला मोडीत काढण्यास अपयश आलं होतं. यामुळे मार्च 2022 मध्ये न्यायालयाने याबाबत हस्तक्षेप केला होता. न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे हा संप मोडीत निघाला.

संप मोडीत निघाला असला तरीदेखील या एसटी कर्मचाऱ्यांची महामंडळ शासनात विलीनीकरणाची मागणी मान्य झाली नाही. मात्र असे असले तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात थोडी वाढ झाली. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 5 हजार, 4000 आणि अडीच हजार एवढी वाढ मात्र सरकारकडून करण्यात आली. या संप काळात मात्र महामंडळा समवेतच कर्मचाऱ्यांचे आर्थिक बचत कोलमडले होते. यामुळे संप काळात 124 कर्मचाऱ्यांनी आपलं जीवन संपवलं होतं. दरम्यान आता या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी देण्याचा शासनाचा हा निर्णय सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.