10वी पास तरुणांसाठी एसटी महामंडळात नोकरीची संधी! या पदाच्या रिक्त जागेवर भरती सुरु; आजच करा इथं अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST Recruitment 2023 : महाराष्ट्रातील दहावी उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आज आम्ही एक मोठी आनंदाची बातमी घेऊ हजर झालो आहोत. जस की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच नवनवीन सरकारी नोकरीच्या संदर्भात अपडेट्स घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण दहावी पास उत्तीर्ण साठी नोकरीची माहिती घेऊन हजर झालो आहोत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये विविध पदाच्या 100 रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. यामुळे ज्या तरुणांना एसटी महामंडळामध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांना ही आनंदाची पर्वणी राहणार आहे. दरम्यान आज आपण नेमक्या कोणत्या रिक्त पदासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय राहील? याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

हे पण वाचा :- मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट ! मे महिन्यात सुरु होणार ‘हा’ महत्वाचा बोगदा; एका तासाचा प्रवास आता केवळ 10 मिनिटात, पहा…..

कोणत्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत जळगाव आगारात मेकॅनिक (मोटार व्हेईकल), मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर (गॅस व इले.) या पदांच्या रिक्त 100 जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या खालील प्रमाणे

मेकॅनिक (मोटार व्हेईकल) – 60 पदे

मेकॅनिक डिझेल – 25 पदे

मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स – 13 पदे

वेल्डर (गॅस व इले.) – 2 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. शिवाय संबंधित ट्रेड मधील आयटीआय कम्प्लीट असणे देखील गरजेचे राहणार आहे. आयटीआय केलेल्या तरुणांसाठीच या पदाकरिता अर्ज करता येणार आहे.

हे पण वाचा :- सोलापूर महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी! ‘या’ रिक्त पदासाठी भरती सुरू; दहावी पास करू शकणार अर्ज, पहा डिटेल्स

अर्ज कसा करायचा?

वर नमूद करण्यात आलेल्या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

 मेकॅनिक मोटर वेहिकल या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63e6127a9e4ccf68be6c0859 या लिंक वर क्लिक करून अर्ज सादर करायचा आहे.

मेकॅनिक डिझेल या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63e612d99e4ccf69a6086ca9 या लिंक वर जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे.

मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल्स या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63e613a8db9c165b235b0ca0 या लिंक वर जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे.

वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/63e613f5db9c165b762a042d या लिंक वर जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे.

पगार किती मिळणार?

पगार हा सरासरी 6000 रुपये ते 7700 प्रति महिना एवढा राहणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; सोयाबीन दरात वाढ होणार का? पहा काय म्हणताय तज्ञ