आनंदाची बातमी ! एसटी महामंडळात ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल दिड लाख रुपये महिना, जाहिरात पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

St Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत एक भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एसटी महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणी तांत्रिक प्रकल्प सल्लागार हे रिक्त पद भरले जाणार आहे.

यासाठी नुकतीच जाहिरात करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर आपला अर्ज सादर करायचा आहे.मात्र ही भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने होणार आहे. दोन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टने उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

अर्थातच या भरतीमध्ये सेवानिवृत्त लोकांना प्राधान्य दिले जाणार आहे. दरम्यान आज आपण या भरती संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- नादखुळा ! उच्चशिक्षित तरुणाने सुरु केली अंजीर शेती; 30 गुंठ्यात मिळवले 10 लाखाचे उत्पन्न, असं केलं नियोजन

कोणत्या पदासाठी निघाली भरती?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे तांत्रिक प्रकल्प सल्लागार (Project Advisor/Consultant) या पदासाठी भरती निघाली आहे.

शैक्षणिक पात्रता?

B.E. किंवा बीटेक इलेक्ट्रिकल किंवा मग Masters degree in management चे शिक्षण घेतलेला उमेदवार यासाठी पात्र राहणार आहे.

हा अनुभव लागेल 

ऊर्जा क्षेत्रातील 30 वर्षे, विशेषत: संपूर्ण राज्यात HT/EHV लाईन्स आणि सबस्टेशन्सच्या संकल्पनेपासून ते सुरू करण्यापर्यंत अनेक प्रकल्पांची अंमलबजावणीचा अनुभव उमेदवाराला असणे जरुरीचे आहे. तसेच उमेदवाराला राज्य किंवा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात संचालक मंडळाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा.

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा आजचा हवामान अंदाज : येत्या काही तासात ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

वयोमर्यादा

58 ते 68 वर्षे वयोगटातील उमेदवार यासाठी पात्र राहणार आहेत.

किती मिळणार पगार

दीड लाख रुपये प्रति महिना वेतन दिल जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – 400008 या पत्त्यावर उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने आपला अर्ज पाठवायचा आहे. अर्थातच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा ! ‘अस’ झालं तर यंदाच्या मान्सून काळात कमी पाऊस पडणार; मान्सून प्रभावित होण्याची शक्यता, पहा काय म्हणताय तज्ञ?