ब्रेकिंग! स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केली मोठी भरती; ‘या’ लोकांना नोकरीची संधी, जाहिरात पहा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Bank Of India Recruitment : देशभरात बँकिंग सेक्टरमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान बँकिंग सेक्टर मध्ये जॉब शोधणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एक मोठी भरती आयोजित झाली आहे. देशातील सर्वात मोठी बँक म्हणून स्टेट बँक ऑफ इंडियाला ओळखलं जातं. दरम्यान स्टेट बँक ऑफ इंडियाने एक मोठी भरती काढली आहे. 

हे पण वाचा :- एल निनो खरच भारतीय मान्सूनवर परिणाम करणार का? यंदा दुष्काळ की सुकाळ, पहा काय म्हणताय तज्ञ

यासाठीची अधिसूचना देखील यापूर्वीच काढण्यात आली आहे. याच्या माध्यमातून तब्बल 868 रिक्त पदांची भरती होणार आहे. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यासाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे.

दरम्यान आज आपण या भरतीबाबत आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत कोणत्या पदांची भरती होणार आहे, यासाठी पात्रता काय राहील, तसेच अर्ज करण्याची शेवटची दिनांक, अर्ज करण्याची पद्धत याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- मुंबई गोवा महामार्गबाबत मोठी अपडेट ! अखेर नितीन गडकरींनीच सांगितले केव्हा होणार रखडलेल काम; फोटोही केलेत शेअर

कोणत्या पदांसाठी आयोजित झाली आहे भरती

SBI च्या माध्यमातून बिजनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर या पदाच्या एकूण 868 रिक्त जागांसाठी ही भरती काढण्यात आली आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा 

या पदासाठी एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया मधून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांनाच निवडलं जाणार आहे. म्हणजेच इतर उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार नाही. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये.

हे पण वाचा :- 1 एप्रिलपासून काय होणार महाग काय होणार स्वस्त; आताच चेक करा यादी

अर्ज कसा करावा लागणार?

इच्छुक आणि पात्र व्यक्तींना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. https://sbi.co.in/web/careers या एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक?

इच्छुकांनी पात्र उमेदवारांना 31 मार्च 2023 पर्यंत अर्थातच उद्यापर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे. यामुळे इच्छुक आणि पात्र व्यक्तींना लवकरात लवकर आपला अर्ज सादर करायचा आहे.

कशी राहणार निवड प्रक्रिया?

या भरतीच्या माध्यमातून एसबीआय कडून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड होणार आहे. 

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ईस्टर्न फ्रीवे बाबत मुंबई महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, वाचा याविषयी…