मकरसंक्रांतपूर्वी राज्य कर्मचाऱ्यांना 38% दराने डीए लागू ; मात्र जानेवारी महिन्यापासून महागाई भत्ता वाढ केव्हा? कर्मचाऱ्यांचा प्रश्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee DA Hike : महाराष्ट्र राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी 2022 हे वर्ष निश्चितच फारसे असे लाभदायी राहिले नाही. मात्र 2023 च्या सुरुवातीलाच राज्य कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून मोठे गिफ्ट देण्यात आल आहे. 10 जानेवारी 2022 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केपी बक्षिच्या शिफारशी राज्य कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आल्या.

ही महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक दिवसापासूनची मागणी होती मात्र अखेर 2023च्या पहिल्याच महिन्यात याला मुहूर्त सापडला. दरम्यान 10जानेवारीला अजून एक मोठा निर्णय झाला तो म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ अनुज्ञय करण्यात आली. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे चार टक्के दराने महागाई भत्ता वाढवण्यात आला. म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे.

हा डीए जुलै महिन्यापासून वाढवण्यात आला असून याचा रोखीने लाभ माहे जानेवारीपासून मिळणार आहे. अर्थातच जुलै ते डिसेंबर दरम्यानची डीए थकबाकी देखील मिळणार आहे. निश्चितच मकर संक्रांतीच्या पर्वावर राज्य कर्मचाऱ्यांसाठी यामुळे मोठा आर्थिक फायदा झाला आहे. दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून पुन्हा एकदा डीए वाढ अनुज्ञय होणार आहे.

म्हणजे सध्या मिळत असलेल्या 38% महागाई भत्त्यात वाढ केली जाणार आहे. वास्तविकता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून चार टक्के दराने महागाई भत्ता वाढ दिली जाईल अशी आशा होती. मात्र आता केंद्रीय कामगार मंत्रालयाकने डिसेंबर महिन्यातील AICPI चे निर्देशांक जाहीर केले आहेत ज्यामध्ये आकडेवारी वाढलेली नसल्याने डीए वाढ चार टक्के ऐवजी तीन टक्के दिली जाणार आहे.

म्हणजेच आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून 41 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाणार आहे. अर्थातच अजून केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही जानेवारी महिन्यापासूनची डीएवाढ अनुज्ञय झालेली नाही. यामुळे ही वाढ आता केव्हा दिली जाईल असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहे.

दरम्यान काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये लवकरच याबाबत केंद्र सरकारकडून निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. साहजिकचं केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ लागू झाल्यानंतर लगेचच राज्य कर्मचाऱ्यांना देखील ही डीए वाढ लागू केली जाणार आहे.