Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

ब्रेकिंग; राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय !

State Employee March Payment : राज्य कर्मचाऱ्यांना आगामी आठ ते दहा दिवसात मार्च महिन्यातील वेतन मिळणार आहे. 7 एप्रिलपासून राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन मिळण्यास सुरुवात होणार आहे. अशातच राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत एक मोठी माहिती हाती येत आहे. शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून यामुळे सरळ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जसं की आपणास ठाऊकच आहे की, राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना अर्थातच ओ पी एस पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने सर्व राज्य कर्मचाऱ्यांना लागू करा या आपल्या प्रमुख मागणीसाठी 14 मार्च 2023 ते 21 मार्च 2023 पर्यंत संप पुकारला होता. वास्तविक हा एक बेमुदत संप होता मात्र राज्य कर्मचाऱ्यांना शासनाकडून जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.

हे पण वाचा :- ठाणे महानगरपालिकेत मोठी भरती; दहावी पास तरुणांना नोकरीची संधी, थेट मुलाखतीने होणार निवड, पहा संपूर्ण जाहिरात

दरम्यान त्यावेळी शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या संप काळातील रजेबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असा आश्वासन देखील देण्यात आल होत. मात्र आता राज्य शासनाने संपात सामील झालेल्या जवळपास 17 ते 18 लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपकाळात गैरहजर असल्याने वेतनात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 28 मार्च 2023 रोजी याबाबतचा शासन निर्णय देखील राज्य शासनाकडून निर्गमित झाला आहे. त्यामुळे हा 18 लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना फटका असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.

हे पण वाचा :- सातारा, मुंबईकरांसाठी खुशखबर! नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग तयार होणार, ‘असा’ असणार रूटमॅप, नितीन गडकरी घेणार मोठा निर्णय

आम्ही आपणास सांगू इच्छितो की संप काळात सहभागी कर्मचाऱ्यांचा तो काळ खंडित न करता असाधारण रजा म्हणून त्याला मान्यता देण्याचे काम 28 मार्च रोजी करण्यात आले आहे. असाधारण रजा म्हणजे रजा कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे वेतन / भत्ते कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येत नाहीत. संप काळातील कालावधी खंडित न समजता असाधारण रजा मंजूर करून एक प्रकारे राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला असला तरी देखील त्यांच्या वेतनात कपात होणार आहे.

म्हणून हा निर्णय पुन्हा बदलला जावा आणि राज्य कर्मचाऱ्यांना त्या कालावधीमधलही वेतन मिळावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. यासाठी वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यामुळे आता या निर्णयावर शासन फेरविचार करते का आणि कर्मचाऱ्यांना संपकाळाच देखील वेतन देते का याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव तयार; ‘इतका’ वाढणार DA, पहा पगारात किती वाढ होणार?