मोठी बातमी ! राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार चार टक्के वाढ; ‘या’ महिन्याच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील सर्व राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे.

सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये चार टक्के वाढ होणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. या महागाई भत्ता वाढीचा लाभ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार याचा प्रत्यक्ष लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत राज्य कर्मचाऱ्यांना देऊ केला जाणार आहे. अर्थातच जुलै महिन्यात याचा लाभ रोखीने राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. तसेच जानेवारी ते मे या महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देखील राज्य कर्मचाऱ्यांना देऊ केली जाणार आहे.

हे पण वाचा :- मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसबाबत मोठी अपडेट ! ‘या’ दिवशी सुरु होणार; कोणत्या स्टेशनवर थांबा घेणार, कस राहणार वेळापत्रक आणि तिकीट दर? वाचा…

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 19 मे 2023 रोजी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार राज्यातील न्यायिक अधिकारी व सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला आहे. याचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे.

म्हणजे आता राज्यातील न्यायिक अधिकारी व सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. यामुळे राज्यातील सर्व राज्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला पाहिजे अशी मागणी राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली.

हे पण वाचा :- तरुणांसाठी वन विभागात नोकरीची सुवर्णसंधी; ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल 40 हजार, वाचा सविस्तर

दरम्यान या मागणीवर राज्य शासन सकारात्मक असून यावर लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. पुढील महिन्यात अर्थातच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार असून जून महिन्याच्या वेतनसोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ देणे निश्चित करण्यात आले आहे. एकंदरीत राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा :- स्टॉक असावा तर असा ! ‘या’ स्टॉकनें 3 वर्षातच आपल्या गुंतवणूकदारांना दिला करोडोचा परतावा, वाचा…