State Employee News : ब्रेकिंग ! राज्य कर्मचाऱ्यांच्या नोव्हेंबर महिन्यातील पेमेंट संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय झाला जारी

State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पेमेंट संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय समोर आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2022-2023 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित निधी झाला आहे. हा निधी राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / थकबाकी अदा करण्यासाठी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

दरम्यान सदर निधींचे लेखाशिर्षनिहाय वाटप करणेबाबतचा शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडुन एक महत्त्वाचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे. दि.28.11.2022 रोजी सदर जीआर जारी झाला आहे. अशा परिस्थितीत आज आपण या महत्त्वाच्या शासन निर्णयाविषयी म्हणजे शालेय शिक्षण विभागाचा निधी वाटप संदर्भातील सविस्तर जीआर थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आपल्या माहितीसाठी महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2022 अंतर्गत 2022-2023 चे अनुदान वितरण करणेबाबत जीआर समोर आला आहे. सदर शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडुन निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाच्या माध्यमातून बिम्स प्रणालीवर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सदर निधींमधून कर्मचारी वेतन, थकबाकी, इतर खर्च करीता वित्त विभागंकडुन निधींची उपलब्धता बीम्स प्रणालीवर उपलब्ध झाला आहे. दरम्यान वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजुर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या अधीन राहून तसेच यामधील अटी व शर्तीचे पालन करून तसेच मुंबई वित्तीय नियम मधील तरतुदींचे पालन करण्याच्या सूचना या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2022 अंतर्गत सन 2022 23 चे अनुदान वितरण करणे बाबत जारी झालेला शासन निर्णय खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता

शासन निर्णय