मोठी बातमी ; महाराष्ट्रातील ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांना बसणार जोर का झटका ! पेन्शन आणि ग्रॅच्युटीबाबत राज्य सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या केंद्रीय नागरी सेवा नियम 2021 च्या नियम आठ मध्ये बदल केल्याची माहिती हाती आली आहे. या बदलानुसार आता कामामध्ये हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटी पासून वंचित ठेवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याने आपल्या सेवा काळामध्ये गंभीर गुन्हा केला असल्यास किंवा निष्काळजीपणे काम करण्यात दोषी आढळून आल्यास आता नवीन नियमानुसार अशा कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचे लाभ बंद केले जातील.

हाती आलेल्या माहितीनुसार आता पेन्शन आणि ग्रॅच्युइटी संदर्भात बनवण्यात आलेल्या नविन नियमानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी, न्यायालयीन चौकशी, कारवाई प्रलंबित असल्यास त्याची माहीती संबंधित विभागाला देणे आवश्यक राहणार आहे. तसेच या प्रकरणांमध्ये कर्मचारी हा दोषी आढळून आला तर त्याची पेन्शन आणि ग्रॅच्युईटी त्याला दिली जाणार नाही.

दरम्यान अशा प्रकरणांवर कारवाई करण्याचा अधिकार हा संबंधित कार्यालय प्रमुखाला देण्यात आला असल्याची माहिती हाती आली आहे. निश्चितच आता कामाबाबत हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच इतर प्रकरणात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी पासून वंचित राहावे लागणार आहे. यामुळे कर्मचारी आता अजूनच काटेकोरपणे आपली कर्तव्य बजावतील असं जाणकार लोक नमूद करत आहेत.

सध्या स्थितीला केंद्र सरकारने हा निर्णय केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी घेतला असून लवकरच महाराष्ट्र राज्यात हा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला जाऊ शकतो अशा चर्चेला सध्या उधाण आला आहे. याबाबत राज्य सरकारने कोणतीच औपचारिक अशी घोषणा केलेली नाही.

मात्र केंद्र सरकारने ही नवीन नियमावली ऍडॉप्ट केली असल्याने राज्य शासन देखील ही नियमावली स्वीकृत करेल आणि अशा राज्य कर्मचाऱ्यांना देखील पेन्शन तसेच ग्रॅच्युटी पासून वंचित ठेवले जाऊ शकते असे सांगितले जात आहे.