Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

आनंदाची बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढला; आता केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार 42 टक्के DA, वाचा सविस्तर

State Employee News : केंद्र शासनाच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकतीच महागाई भत्त्यात मोठी वाढ देण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए म्हणजेच महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढवला पाहिजे अशी मागणी जोर धरत होती. दरम्यान राज्य शासनाने राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे.

राज्य सरकारच्या दुय्यम न्यायालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ झाली असून आता या कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.

हे पण वाचा :- शिर्डी, मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, पहा….

यामुळे सदरील कर्मचारी मोठ्या आनंदात आहेत. विशेष बाब म्हणजे महागाई भत्ता वाढ ही एक जानेवारी 2023 पासून लागू राहणार आहे. म्हणजे याचा लाभ हा मे महिन्याच्या वेतनासोबत रोखीने मिळणार आहे, परंतु महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे.

अर्थातच या संबंधित कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून ते एप्रिल महिन्यापर्यंतची थकबाकी देखील मिळणार आहे. निश्चितच चार महिन्याची DA थकबाकी या संबंधित कर्मचाऱ्यांना देऊ केली जाणार आहे.

ही महागाई भत्त्यातील वाढ दुय्यम न्यायालयांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देखील लागू होणार असल्याने त्यांच्या निवृत्तिवेतनात देखील मोठी वाढ होणार आहे. यासाठीचा शासन निर्णय अर्थातच जीआर राज्य शासनाने शुक्रवारी म्हणजेच काल 19 मे 2023 रोजी निर्गमित केला आहे.

हे पण वाचा :- शेअर मार्केटमध्ये वयाच्या कितव्या वर्षापासून पैसे गुंतवले जाऊ शकतात? शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा नियम काय, पहा….

दरम्यान, न्यायालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारने इतर अन्य कर्मचाऱ्यांनाही केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता द्यावा. भेदभाव केला जाऊ नये, तसेच इतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरात लवकर DA वाढीचा लाभ मिळावा. अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली आहे.

एकंदरीत राज्य शासकीय सेवेतील दुय्यम न्यायालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली असल्याने आता लवकरच राज्य शासन सेवेतील इतरही संवर्गातील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढ मिळेल असा आशावाद व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘ही’ बंद झालेली एक्सप्रेस ट्रेन पुन्हा होणार सुरू, केव्हा धावणार? पहा….