राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू, किती वाढणार पगार? पहा….
State Employee News : महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकृत केले आहेत.या समितीच्या शिफारशी स्वीकृत झाल्यानंतर राज्यातील अनेक पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा होणार आहे. यानुसार आता राज्यातील काही पात्र राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीत सुधारणा देखील झाली आहे.
या बक्षी समितीच्या शिफारसी स्वीकृत झाल्यानंतर आता राज्यातील ज्या अकरावी व बारावीचे वर्ग असणाऱ्या स्वतंत्र उच्च माध्यमिक म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांना नवीन वेतनश्रेणी लागू झालेली नव्हती अशा मुख्याध्यापकांना नवीन सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे.
हे पण वाचा :- ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ विद्यापीठात निघाली भरती, 35 हजार रुपये पगार मिळणार, वाचा….
स्वतंत्र म्हणजे जे माध्यमिक शाळांशी सलग्न नाहीत अशा कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापकांना आता सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे.आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, या उच्च माध्यमिक शाळांचेच मुख्याध्यापक सुधारित वेतनश्रेणी पासून वंचित होते. मात्र आता बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकृत झाल्यामुळे त्यांना याचा लाभ मिळणार आहे.
आता या स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापकांना ४७६००–१५११०० ही वेतनश्रेणी लागू होणार आहे. आतापर्यंत या मुख्याध्यापकांना इतर उच्च माध्यमिक प्रमाणे ४४९००-१४२४०० या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळत होतं.
यामध्ये आता सुधारणा झाली आहे. निश्चितच या निर्णयामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. पण या सुधारित वेतनश्रेणीचा लाभ घेण्यासाठी संबंधित मुख्याध्यापक पदव्युत्तर पदवीधर व बी.एड झालेला असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा :- नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! आता सिडको Navi Mumbai मध्ये निओ मेट्रो सुरु करणार, कसा राहणार रूट, पहा…..
ही सुधारित वेतन श्रेणी या मुख्याध्यापकांना पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ जानेवारी २०१६ पासून लागू होणार असल्याची माहिती देखील जाणकार लोकांनी यावेळी दिली आहे. या सोबतच तबलजी या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आता नवीन वेतनश्रेणी बहाल करण्यात आली आहे.
यानुसार आता तबलजी पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना २५५०० – ८११०० अशी सुधारित श्रेणी लागू केले जाणार आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना मुख्याध्यापकांप्रमाणे पूर्वलक्षी प्रभावाने याचा लाभ मिळणार नाही.
निश्चितच, राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय या संबंधित राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचा असून यामुळे या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता वाढ होणार आहे. परिणामी राज्य शासनाच्या या निर्णयाचे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.
हे पण वाचा :- महाराष्ट्रात रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 3190 जागांसाठी निघाली भरती, 10वी आणि 12वी पास उमेदवार राहणार पात्र, वाचा….