धक्कादायक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांची शिंदे फडणवीस सरकारच्या काळात 960 कोटी रुपयांची देणी थकली; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : महाराष्ट्रातील काही राज्य कर्मचाऱ्यांना आपल्या वेतनासाठी देखील शासनासोबत झगडावे लागत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नाही तर एसटी कर्मचाऱ्यांची तब्बल 960 कोटी रुपयांची देणी थकली असल्याची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

खरं पाहता गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीला शासनात विलीनीकरण करावे या आपल्या मुख्य मागणीसाठी तब्बल सहा महिने संप पुकारला होता.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! कोरडवाहू शेतीतून मिळवल एकरी 12 क्विंटल सोयाबीन, अन गव्हाचे उत्पादन; वाचा ही भन्नाट यशोगाथा

त्यावेळी हे प्रकरण न्यायालयात गेलं आणि न्यायालयात सरकारच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांसाठी पुढील चार वर्ष वेतनाची जबाबदारी घेण्यात आली होती. मात्र शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गेल्या 11 महिन्यात कर्मचाऱ्यांची तब्बल 960 कोटी रुपयांची देणी थकली आहेत.

यामध्ये उपदान, भविष्य निर्वाह निधी आणि एसटी बँकेच्या थकबाकीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपदान आणि भविष्य निर्वाह निधीचा तब्बल 800 कोटी रुपयांचा यामध्ये समावेश आहे. वास्तविक उपदान आणि भविष्य निर्वाह निधीसाठी स्पेशल ट्रस्ट आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजनेसाठी एक पाऊल पडले पुढे ! OPS योजनेबाबत झालं ‘हे’ महत्वाचं काम, वाचा सविस्तर

पण एसटीने या ट्रस्टमध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेला उपदानाचा आणि भविष्य निर्वाह निधीचा पैसा जमा केलेला नाही. यामुळे या काळातील उपदानाचे तसेच भविष्य निर्वाह निधी वरील पैशांचे व्याज देखील बुडाले आहे. एकंदरीत याचा सरळ फटका कर्मचाऱ्यांना बसत आहे.

अशा परिस्थितीत न्यायालयात सरकारने दिलेल आश्वासन आणि घेतलेली हमी सरकारकडून पूर्ण केली जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे ही थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर मिळाली पाहिजे अशी मागणी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून केली जात आहे. यामुळे शासन आता यावर काय निर्णय घेते? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! कांदा अनुदानासाठी ई-पीक पेऱ्याची अट झाली रद्द; पण……