State Employee News : राज्य शासनाने फेब्रुवारी 2023 मध्ये एक मोठा निर्णय घेतला. या निर्णयानुसार राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मानधनात वाढ करण्यात आली. यासाठी सात फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णय देखील काढण्यात आला. या शासन निर्णयानुसार राज्यातील शिक्षण सेवक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली. मात्र याची अंमलबजावणी अद्याप झालेली नव्हती.
परंतु आता याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. यासाठी 17 एप्रिल 2023 रोजी अधीक्षक कार्यालय गडचिरोली यांच्या माध्यमातून एक परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार आता जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या शिक्षण सेवक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होणार आहे. तसेच ही मानधन वाढ जानेवारी 2023 पासून लागू राहणार आहे.
हे पण वाचा :- भारतीय हवामान विभागाचा गंभीर ईशारा; आता ‘या’ जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस !
अर्थातच या कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासूनची थकबाकी म्हणजे फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. निश्चितच शिक्षण सेवकांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सदर अधीक्षक कार्यालयाने काढलेल्या पत्रकानुसार खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षकेत्तर सेवक यांचे मानधन दि.01 जानेवारी 2023 पासून वाढ करण्यात आलेली आहे.
आता जिल्ह्यातील सर्व प्राचार्य / मुख्याध्यापक यांना आदेशित करण्यात आले आहे की, शिक्षण सेवक/ शिक्षकेत्तर सेवक यांचे मानधनात वाढ करुन शालार्थ प्रणालीमध्ये चेंज डिटेल्स मध्ये चेंज करुन कार्यालयाचे लॉगीनवर पाठवण्यात यावे.
तसेच याचा प्रस्ताव देखील कार्यालयास सादर करण्याचे निर्देश या पत्रकात देण्यात आले आहेत. म्हणजे आता जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात वेतन वाढीचा लाभ मिळणार आहे तसेच जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची फरकाची रक्कम देखील मिळणार आहे.
हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांनो काळजी घ्या ! ‘हा’ हलगर्जीपणा केला तर बसणार मोठा दंड, आता पोलीस कार्यालयात येऊन करणार कारवाई; पहा….
किती झालीय मानधनवाढ
आता प्राथमिक व उच्च प्राथमिकमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकाला 16,000 मानधन मिळणार आहे.माध्यमिक मध्ये कार्यरत शिक्षक सेवकाला 18000 मानधन मिळणार आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षण सेवकाला 21 हजार रुपये मानधन मिळणार आहे. ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 14 हजार, 12 हजार आणि दहा हजार मानधन आता मिळणार आहे.