Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

शिंदे सरकार ‘या’ एका कारणामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष करणार, पहा….

State Employee Retirement Age Will Increase : राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना अर्थातच ओ पी एस योजना पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी आक्रमक आहेत.

State Employee Retirement Age Will Increase : राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून 2005 नंतर राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना अर्थातच ओ पी एस योजना पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी आक्रमक आहेत. यासाठी गेल्या महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांनी संपदेखील पुकारला होता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जुनी पेन्शन योजना सहित राज्य कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवण्यासाठी अर्थातच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यासाठी झटत आहेत. जुनी पेन्शन योजना ही मागणी निश्चितच प्रमुख मागणी आहे मात्र सेवानिवृत्तीचे वय वाढवणे हे देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या मागणीमध्ये समाविष्ट आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यावर 625 कोटी 32 लाख रुपये झालेत जमा; तुम्हाला मिळाला का लाभ, पहा…..

दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या संपामध्ये जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक तोडगा करण्याचे आश्वासन राज्य शासनाकडून देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता राज्य कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवण्यासाठी आक्रमक बनले आहेत. या मागणीसाठी कर्मचारी आता आक्रमक बनले आहेत.

राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत झालेल्या चर्चेत सेवानिवृत्तीचे वय वाढवावे अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मकता दाखवली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्षे करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. कर्मचाऱ्यांच्या मते दरवर्षी साठ हजार कर्मचारी निवृत्त होत असतात.

हे पण वाचा :- मुंबई, ठाणेकरांसाठी खुशखबर! ‘या’ ठिकाणी तयार होताय तीन नवीन पूल, पहा सविस्तर

निवृत्त सरकारी कर्मचाऱयांना साठ लाख रुपये निवृत्ती निधी द्यावा लागतो. परिणामी 60 हजार कर्मचाऱयांवर सरकारला दर वर्षाला 3 हजार 600 कोटी रुपयांचा बोजा येतो. ते पाहता निवृत्तीचे वय 60 केल्यास सरकारचे दरवर्षी चार हजार कोटी रुपये वाचतील. निश्चितच जर राज्य कर्मचाऱ्यांचे हे म्हणणे व्यवहार्य असेल तर शिंदे सरकारकडून यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्षांनी वाढ केली जाऊ शकते असं मत काही तज्ञांकडून व्यक्त होत आहे.

एकंदरीत जुनी पेन्शन योजनेनंतर आता सेवानिवृत्तीचे वय वाढवण्यासाठी राज्य कर्मचारी आक्रमक बनले आहेत. विशेष बाब म्हणजे राज्य शासनाने यावर सकारात्मकता दाखवली आहे. यामुळे राज्य शासन याबाबतचा शासन निर्णय केव्हा काढते? यावर सकारात्मक निर्णय केव्हा घेते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, संभाजी नगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, नांदेड, लातूर, परभणी, बीडसह ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार !…