State Employee Strike : राज्यात सध्या जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस योजनेवरून सरकार आणि कर्मचारी आमने-सामने आले आहेत. राज्य कर्मचारी 14 मार्चपासून जुनी पेन्शन योजना लागू करा या आपल्या मुख्य मागणीसाठी संपावर आहेत. आज या संपाचा तिसरा दिवस. या संपातून निश्चितच काही कर्मचारी संघटनांनी माघार घेतली असली तरी देखील अद्याप 17 लाखांच्या वर सरकारी कर्मचारी या संपात सक्रिय सहभागी आहेत.
परिणामी शासकीय कार्यालय ओस पडले आहेत. यामुळे सामान्य जनतेला सर्वाधिक फटका बसत असून शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारने 14 मार्च रोजी तीन सदस्य समिती स्थापन करून यावर तोडगा काढू अस आश्वासन कर्मचाऱ्यांना दिल आहे. मात्र कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत जुनी पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहील असा पवित्रा घेतला आहे.
हे पण वाचा :- गुढीपाडव्याला मिळणारा आनंदाचा शिधा नेमका कधी वितरित होणार? वाचा याविषयी सविस्तर
दरम्यान राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीसाठी विरोधकांकडून या संपाला खुला पाठिंबा देण्यात आला आहे. शिवाय अधिवेशनात सरकारला धारेवर धरले जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला गेला आहे. खरं पाहता, सरकार आणि राज्य कर्मचारी यांच्यात संपाबाबत तोडगा निघालेला नाही. पण आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन पेन्शन योजने संदर्भात एक मोठा निर्णय झाला आहे.
एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. आता नवीन पेन्शन योजनेमध्येच जुन्या पेन्शन योजनेच्या काही तरतुदी समाविष्ट करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आता नवीन पेन्शन म्हणजेच एनपीएस योजनेत कुटुंब निवृत्ती वेतन आणि कर्मचाऱ्याचं मृत्यू योगदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
हे पण वाचा :- चर्चा तर होणारच ! डॉक्टराने चक्क गाईच्या वासराच केल शाही बारस; अख्या परिसरात रंगली या शाही सोहळ्याची चर्चा
एकंदरीत सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा प्रयत्न आहे. मात्र असे असले तरी अद्याप या बदलामुळे कर्मचाऱ्यांना किती निवृत्तीवेतन मिळेल वेतन कशा स्वरूपात मिळेल याबाबत स्पष्टता येणे बाकी आहे. परंतु नवीन पेन्शन योजनेत सुधारणा झाली असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त संस्थेने दिले आहे. निश्चितच, शिंदे सरकारने हा निर्णय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतला आहे. यामुळे आता या निर्णयावर संपकरी कर्मचाऱ्यांकडून काय प्रतिक्रिया दिल्या जातात? संप आता बंद केला जाईल का? यांसारखे प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत.
दरम्यान राज्य मंत्रिमंडळाचा हा निर्णय जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत संपाबाबत आणि निर्णयाबाबत स्पष्टक्ती येणार नसल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे. एकंदरीत या संपामुळे सरकार बॅकफूटवर आले आहे. यामुळे आता कर्मचारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या निर्णयाकडे कशा पद्धतीने पाहतात, संप मोडीत काढतात का याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.
हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! अर्धा एकरात ‘या’ फळपिकाची शेती सुरु केली, अन मिळवलं तब्बल 11 लाखांचं…