शिंदे सरकारने घोळ संपवला; ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या कामासंदर्भात घेतला ‘हा’ ऐतिहासिक निर्णय, पहा…..

Ajay Patil
Published:
State Employee News

State Government Employee : शिंदे सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आहे शासकीय अनुदानित महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधील अध्यापनाविषयी म्हणजे या संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या अध्यापनाविषयी. जसं की आपणास ठाऊकच आहे की, हिवाळी अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारने तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला होता.

यासाठीचा GR हा 27 मार्च 2023 रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने जारी केला. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शिंदे सरकारचे स्वागत करण्यात आले. दरम्यान आज आणखी एक मोठा निर्णय शासनाने घेतला असून तास आणि तासिका तत्त्वावरील घोळ या निर्णयाने आता निकाली लागला आहे.

हे पण वाचा :- बातमी कामाची ! कर्ज घेण्यासाठी नेमका सिबिल स्कोर किती असावा?, पहा काय म्हणताय तज्ञ

आता राज्य शासनाने अध्यापनाचा तासिका कालावधी साठ मिनिटाचा केला आहे. त्यामुळे तास आणि तासिका यामधील घोळ संपुष्टात येईल आणि यामुळे प्राध्यापकांना दिलासा मिळेल असा आशावाद यानिमित्ताने व्यक्त होत आहे. वास्तविक तास आणि तासिकामधील घोळ दूर करण्याची प्राध्यापकांची मागणी वेतन वाढीप्रमाणेच फार जुनी आहे.

मात्र यावर शासनाकडून निर्णय घेतला जात नव्हता. अध्यापकांच्या माध्यमातून शासनाकडे यासाठी वारंवार पाठपुरावा सुरू होता. अखेरकार आज उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तासिका कालावधी 60 मिनिटांचा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा :- पुण्याच्या शेतकऱ्याचा नादखुळा ! पावणे दोन एकरात सुरू केली आल्याची शेती, मिळाले 18 लाख 50 हजाराचे उत्पन्न, बनलेत लखपती; पहा ही भन्नाट यशोगाथा

म्हणजे आता तास आणि तासिका समान राहणार आहेत. आतापर्यंत तासिका 48 मिनिटांची असायची मात्र आता येत्या शैक्षणिक वर्षापासून 60 मिनिटांची तासिका राहणार आहे. अर्थातच तोपर्यंत सध्याचा तासिका कालावधी विद्यापीठांना सुरू ठेवता येणार आहे. मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून तास आणि तासिका यामधील घोळ कायमचा दूर होणार आहे.

खरं पाहता आज तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या प्राध्यापकांना मानधन वाढीचा लाभ देण्यात आला आणि आता तासिका 60 मिनिटाची करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आता वर्सोवावरून समुद्रमार्गे पालघर जाता येणार; प्रवासाचा वेळ येणार निम्म्यावर, पहा कसा असेल मार्ग

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe