Success Story : देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेतीशी निगडित व्यवसायावर आधारित आहे. देशातील 60% लोकसंख्या ही शेतीची पार्श्वभूमी असलेली आहे. मात्र असे असले तरी आजही शेतकरी कुटुंबाकडे, जगाचं पोट भरणाऱ्या बळीराजाकडे पाहण्याचा सुशिक्षित समाजाचा दृष्टिकोन हा मागासलेलाच आहे.
शेतकरी म्हणजे अशिक्षित, अडाणी, व्यवहार शून्य, गावठी असं म्हणून उच्चभ्रू समाजातील लोक आजही शेतकऱ्यांना हिणवत असल्याचे अनेकदा पहावयास मिळते. मात्र आता शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित शेतकरी पुत्रांनी आपल्या कार्याने उच्चभ्रू समाजातील तरुणांना देखील मात देण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी पुत्र आता शैक्षणिक क्षेत्रात मोठं कौतुकास्पद असं काम करत आहेत.
शिक्षणात आपल्या कल्पक बुद्धिमत्तेने आणि कौशल्याच्या जोरावर चांगली कामगिरी करू लागले आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतकरी पुत्रांनी आता एमपीएससी, यूपीएससी सारख्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये देखील आपला झेंडा रोल आहे. एवढेच नाही तर आता मानांकित कंपनीमध्ये देखील शेतकरी पुत्र चांगल्या लाखो रुपयांच्या पगाराच्या नोकरीवर रुजू होत आहेत.
दरम्यान धुळे जिल्ह्यातील एसव्हीकेएम संचलित एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठाच्या शिरपूर कॅम्पस मध्ये बी.टेक.च शिक्षण घेणाऱ्या दोन शेतकरी पुत्रांनी देखील आपल्या कौशल्याच्या जोरावर देशातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असलेल्या ट्रायडेंट लिमिटेड लुधियाना या कंपनीमध्ये तब्बल 18 लाख रुपये पॅकेजची नोकरी मिळवली आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘त्या’ जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा, कर्जमाफीची मोठी घोषणा
संदीप रामदास वाघ व सागर रवींद्र बिडकर असे या दोन विद्यार्थ्यांची नावे असून ते एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठात बी टेक च्या शेवटच्या वर्षात शिकत आहेत. संदीप आणि सागर या दोन्हींनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये ट्रायडेंट लिमिटेडने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्यूमध्ये कंपनीत नोकरी मिळवली आहे. या दोघांना 18 लाख रुपये पॅकेज देऊन कंपनीत नियुक्ती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या विद्यापीठात झालेल्या कॅम्पस प्लेसमेंट मध्ये आत्तापर्यंतच सर्वात मोठ पॅकेज या दोघांना मिळाल आहे. निश्चितच या दोघा तरुणांनी विद्यापीठाच्या शिरेपेच्यात देखील मानाचा तुरा रोवला आहे.
या कंपनीच्या माध्यमातून समूहचर्चा आणि वैयक्तिक मुलाखत अशा दोन टप्प्यांवर विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये या दोघांनी चांगली कामगिरी करत या कंपनीत आपलं स्थान पक्क केल आहे. या दोघांनी व्यापक शिक्षणाचा अनुभव घेतला असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकपूर्ण शिक्षण घेतले आहे.
त्यांच्या या यशामुळे विद्यापीठातील शिरपूर कॅम्पस मधील इतर मुलांना देखील प्रेरणा मिळणार आहे. त्यांच्या या यशावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. विद्यापिठाचे कुलपती, प्राध्यापक एवढेच नाही तर आमदार अमरीश भाई पटेल यांनी देखील या दोघा शेतकरी पुत्रांच तोंडभरून कौतुक केल आहे. निश्चितच शेतकरी पुत्र आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेले नाहीत, याचच हे एक उत्तम उदाहरण आहे.
हे पण वाचा :- 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची शेवटची यादी आली; पण ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही योजनेचा लाभ, तुम्ही पण आहात का यादीत, पहा