Success Story : अलीकडे सोशल मीडियाचा प्रत्येक क्षेत्रात वावर वाढला आहे. सोशल मीडियाचा वापर शेतकरी कामगार, शेतमजूर, विद्यार्थी, महिला सर्वचजण करू करत आहेत. प्रामुख्याने सोशल मीडिया व्हाट्सअप, युट्युबचा वापर हा विरंगुळ्यासाठी होतो. अनेकजण यातून माहितीची देवाण-घेवाण देखील करतात. विशेषतः यूट्यूब च्या माध्यमातून सर्वच माहिती लोकांना व्हिडीओच्या माध्यमातून सहजच मिळू लागली आहे. शेती विषयक देखील माहिती युट्युब मध्ये मोठ्या प्रमाणात असते आणि याचा फायदा आता शेतकऱ्यांना होत आहे.
सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील खंडाळा तालुक्याच्या एका शेतकऱ्याने देखील युट्युब वरून माहिती घेऊन ड्रॅगन फ्रुट ची लागवड सुरू केली आहे. विशेष म्हणजे 71 वर्षीय शेतकऱ्याने सुरू केलेले ड्रॅगन फ्रुटची शेती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली असून पंचक्रोशीत सध्या या प्रयोगशील शेतकऱ्याची चर्चा आहे. तालुक्यातील वहागाव अहिरे येथील शंकर विष्णू पवार यांनी माळरानावर ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याची किमया साधली आहे.
हे पण वाचा :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांच्या पश्चात आता वारसांनाही मिळणार पेन्शन, पहा…..
वास्तविक शंकर पवार हे 46 वर्ष मुंबईमध्ये वास्तव्यास होते. त्या ठिकाणी त्यांनी आपला व्यवसाय थाटला होता. सहा-सात वर्षांपासून मात्र त्यांनी व्यवसायातून स्वईच्छा निवृत्ती घेतली आहे. ते सध्या शेती करत आहेत. पवार हे एक प्रकल्पग्रस्त असून त्यांना अहिरे येथे जमीन मिळाली आहे. याच जमिनीत ते सध्या ड्रॅगन फ्रुट ची शेती करत आहेत. खरं पाहता ही जमीन खडकाळ होती यामुळे ही जमीन सर्वप्रथम सपाट केली.
त्यानंतर या माळरान जमिनीत ड्रॅगन फ्रुट ची लागवड करण्यात आली. सुरुवातीला पाण्याची सोय नव्हती म्हणून त्यांनी विहीर खोदली. विहिरीचं पाणी मात्र ड्रॅगन फ्रुटला पुरत नाही यामुळे कालव्यातून जलवाहिनीच्या द्वारे विहिरीत पाणी साठवले जाते आणि मग हेच पाणी ड्रॅगन फ्रुटला पुरवलं जातं. ठिबक द्वारे सिंचन होत असल्याने आणि ड्रॅगन फ्रुटला कमी पाणी लागत असल्याने त्यांना हे पाणी पुरत आहे.
हे पण वाचा :- सावधान ! आणखी ‘इतके’ दिवस राज्यातील ‘त्या’ जिल्ह्यात पाऊस पडणार; गारपीटीचीही शक्यता, हवामान विभागाचा गंभीर इशारा
पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर ड्रॅगन फ्रुटचे योग्य व्यवस्थापन केलं. यामुळे यंदाच्या दुसऱ्या हंगामात यापासून त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे. पवार सांगतात की, या पिकातून त्यांना 20 ते 25 वर्ष उत्पादन मिळवणार आहे. सध्या एका झाडापासून पाच ते सहा फळे मिळत आहेत. याला शंभर ते दीडशे रुपये प्रति किलो असा दर आहे.
विशेष म्हणजे आरोग्यासाठी फायदेशीर असलेले हे फळ बाजारात नेहमीच मागणी मध्ये असते. एका एकरात लागवड केलेल्या या ड्रॅगन फ्रुट मधून आता शंकर पवार यांना चांगले उत्पादन मिळू लागले आहे. निश्चितच youtube च्या माध्यमातून ड्रॅगन फ्रुट ची माहिती मिळवून तसेच प्रत्यक्ष ड्रॅगन फ्रुट च्या बागांना भेटी देऊन या पिकाची माहिती घेत साधलेली ही प्रगती इतरांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.
हे पण वाचा :- शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय ! नवीन पेन्शन योजनेसंदर्भात…