Success Story : कोकण म्हटलं की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभ राहत ते भात पिकाचे चित्र. कोकणात प्रामुख्याने भाताची लागवड केली जाते आणि येथील बहुतांश शेतकरी याच पिकाच्या उत्पन्नावर आपल्या संसाराचा गाडा हाकत असतात. मात्र धान पिकाच्या उत्पादनात शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
एकतर धान पिकाला अधिकचे पाणी लागते शिवाय या पारंपारिक पिकाच्या लागवडीत शेतकऱ्यांना अधिकची मेहनत घ्यावी लागते. विशेष बाब म्हणजे यातून प्राप्त होणारे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत असून हाती येणारे उत्पन्न शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह भागवण्यास अक्षम आहे.
एकतर दिवसेंदिवस कृषी निविष्ठांच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. आणि भात पिकाचे उत्पादन दिवसेंदिवस घटत आहे. शिवाय रासायनिक खतांचा वापर या पिकासाठी अलीकडे गरजेचा बनला आहे यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी आता कोकणातील शेतकऱ्यांनी भात पिकाला फाटा देत आता नवीन नगदी पिकांची लागवड सुरू केली आहे.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! 30 अन 31 मार्चला होणार दानाफान, ‘या’ भागात पुन्हा गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा गंभीर इशारा
काही शेतकऱ्यांनी भात पिकाच्या शेतीबरोबरच भाजीपाला आणि फुलशेती सुरू करून चांगली कमाई केली आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील सतीश म्हात्रे यांनी देखील भात पिकाबरोबरच फुलशेती करून चांगली कमाई करून दाखवली आहे. सतीश म्हात्रे सध्या फुल शेती मधून महिन्याकाठी तीस हजारापर्यंतची कमाई करत असून इतर भाजीपाला वर्गीय पिकांमधूनही त्यांना हजारो रुपयांची कमाई महिन्याकाठी होत आहे.
यामुळे पारंपारिक भात पिकासोबतच फुलशेती आणि भाजीपाला शेती त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली आहे. सतीश यांनी दिलेल्या माहितीनुसार ते खरीप हंगामात भाताची लागवड करतात. धानाची काढणी झाल्यानंतर लगेचच त्या जमिनीवर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, जीआय मानांकन मिळालेला अलिबागचा पांढरा कांदा बाजारात कायमच मागणीमध्ये असतो आणि याला चांगला दर मिळतो. यामुळे कांद्याची लागवड ही सतीश यांच्यासाठी फायदेशीर ठरते. सतीश सांगतात की फेब्रुवारी पर्यंत पांढरा कांदा काढला जातो.
हे पण वाचा :- कौतुकास्पद ! सुरू केली कलिंगड अन मिरचीची आंतरपीक शेती; एका एकरात झाली 6 लाखांची कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा
दरम्यान कांदा काढणी झाल्यानंतर त्या ठिकाणी फुलशेतीला सुरुवात केली जाते. फुल शेतीमध्ये वेगवेगळ्या फुलांची ते शेती करतात. यातून त्यांना दिवसाला एक ते दीड हजाराची कमाई होते. यासोबतच भाजीपाला पीक म्हणून तोंडलीची लागवड ते करतात.
याला बाजारात जवळपास 55 रुपये प्रति किलोचा बाजार भाव मिळत असून तोंडली लागवड देखील त्यांच्यासाठी फायदेशीर ठरली आहे. ते सांगतात की, भात पिकातून फारसी कमाई होत नसली तरी देखील फुलशेती, पांढरा कांदा लागवड आणि तोंडली सारख्या भाजीपाला वर्गीय पिकांच्या शेतीतून त्यांना चांगली कमाई होते आणि भात पिकाची कसर यातून ते भरून काढतात.
निश्चितच कोकणातील शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग इतर कोकणातील शेतकऱ्यांसाठी प्रेरक राहणार आहे. खरं पाहता भात पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढे वेगवेगळे आव्हाने कायमच असतात अशा परिस्थितीत जर सतीश प्रमाणे शेतीमध्ये बाजारपेठेचा आढावा घेऊन बदल केला तर निश्चितच शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो.
हे पण वाचा :- पंजाबराव डख हवामानाचा अचूक अंदाज कसा बांधतात; डख यांनी स्वतःच सांगितली याची माहिती