भावा मानलं ! इंजीनियरिंगच्या नोकरीवर ठेवलं तुळशीपत्र, सुरु केलं ससे पालन ; आता कमवतोय महिन्याला 90,000, पहा ही यशोगाथा

Success Story : अलीकडे महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून कायमच चर्चेत राहत आहेत. फक्त शेतीवरच विसंबून न राहता शेतीशी निगडित इतर प्रयोग करत शेतकरी बांधव आता लाखो रुपयांची कमाई करत आहेत. शेतीशी निगडित व्यवसाय यामध्ये पशुपालन प्रामुख्याने शेतकऱ्यांकडून केले जात आहे. पशुपालन व्यवसायात महाराष्ट्रात विशेषता शेळी पालन, म्हैस पालन, गाय पालन केले जाते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र अलीकडे तरुण शेतकऱ्यांनी पशुपालन व्यवसायात देखील वेगवेगळे प्रयोग केले आहेत. यामध्ये खेकडा पालन तसेच इतर काही पाळीव प्राण्यांचे पालन केले जात आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका तरुण शेतकऱ्याने ससे पालनाचा भन्नाट प्रयोग केला असून याच्या माध्यमातून या नवयुवकाला चांगली कमाई देखील होत आहे.

जिल्ह्यातील कुडाळ तालुक्याच्या निलेश गोसावी या तरुणाने हा प्रयोग केला आहे. या ठिकाणी एक गोष्ट विशेष अशी की निलेश उच्चशिक्षित असून इंजिनीयर म्हणून एका कंपनीत कामाला होता. मात्र नोकरीमध्ये मन रमल नाही म्हणून त्याने नोकरी सोडून ससे पालन या व्यवसायात आपलं करिअर घडवण्याचा ठरवलं. सध्या तो ससे पालन व्यवसायातून चांगली कमाई करत असल्याने पंचक्रोशी त्याची चांगलीचं चर्चा आहे.

Advertisement

खरं पाहता इंजिनियर असलेल्या निलेशने ससे पालन हा व्यवसाय तडकाफडकी न सुरु करता यासाठी त्यांनी हरियाणा येथे जाऊन ससे पालन व्यवसायातील बारकावे शिकून घेतले, यासाठी त्यांनी ट्रेनिंग देखील त्या ठिकाणी घेतल आहे. या व्यवसायातील बारकावे शिकून घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला सहा जातीचे 200 ससे आणले. निलेश यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना हा व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण सहा लाख रुपयाचा खर्च आला आहे.

यामध्ये साडेतीन लाख रुपये ससे आणि इतर वस्तूंसाठी खर्च आला तर अडीच लाख रुपये शेड उभारणीसाठी खर्च त्यांना आला आहे. हा व्यवसाय त्यांनी कोरोना काळापासून सुरू केला आहे. निलेशच्या मते, सशाच्या मांसात असलेले औषधी गुणधर्म पाहता याला मोठी मागणी आहे. निलेश स्वतः सहाशे रुपये प्रति किलो या दराने सश्याचे मटन विक्री करत आहे. तसेच तो ससे पालन करण्यासाठी इतरांना सशाचे पिल्ले देखील विकतो.

450 रुपये प्रति पिल्ले अशी विक्री सध्या निलेश करत आहे. अशा पद्धतीने तो महिन्याला 90 हजार रुपये या व्यवसायातून कमाई करत आहे. एवढेच नाही तर सशांच्या मलमूत्रांना देखील मागणी असते. सशाचे मलमूत्र देखील निलेश सध्या विक्री करतो. मात्र ससे पालनात सश्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. निश्चितच ससे पालन व्यवसायातून निलेशने केलेली ही कामगिरी इतरांसाठी मार्गदर्शक अशी राहणार आहे.

Advertisement