कौतुकास्पद ! प्रयोगशील शेतकऱ्याने 20 गुंठ्यात गुलछडीची लागवड केली, चांगले उत्पादन मिळवत साधली आर्थिक प्रगती


पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या मौजे यवत येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील पारंपारिक गुलछडीच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळवत आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे. मौजे यवत येथील प्रयोगशील शेतकरी धनंजय शिवरकर यांनी ही किमया साधली आहे.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer : अलीकडे राज्यातील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये मोठे बदल करत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत नवनवीन नगदी पिकांच्या शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवून दाखवले आहे. विशेष म्हणजे जाणकार लोक देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये बदल करत आधुनिक पद्धतीने शेती कसण्याचा सल्ला देत आहेत.

मात्र असे असले तरी काही प्रयोगशील शेतकरी पारंपारिक पिकांची शेती पारंपारिक पद्धतीनेच पण योग्य नियोजनाच्या जोरावर फायदेशीर करून दाखवत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या मौजे यवत येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील पारंपारिक गुलछडीच्या पिकातून चांगले उत्पन्न मिळवत आर्थिक सुबत्ता प्राप्त केली आहे.

मौजे यवत येथील प्रयोगशील शेतकरी धनंजय शिवरकर यांनी ही किमया साधली आहे. धनंजय यांनी आपल्या वडीलोपार्जित 20 गुंठे म्हणजेच अर्धा एकर जमिनीत गुलछडी लागवडीचा हा प्रयोग यशस्वी करून दाखवला असून यातून त्यांना आता चांगले उत्पन्न मिळत आहे. 

हे पण वाचा :- नादखुळा ! नोकरी सांभाळत सुरू केली शेती, अंजीरच्या बागेतून साधली आर्थिक प्रगती

म्हणून सध्या परिसरात धनंजय यांचा हा प्रयोग चर्चेचा विषय ठरला आहे. धनंजय यांनी दिलेल्या माहितीनुसार गुलछडी लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीत शेणखत टाकले त्यानंतर नागरणी, रोटावेटर मारून जमीन तयार करण्यात आली. साडेचार फुटांची सरी काढण्यात आली.

यानंतर गुलछडी लागवड करण्यात आली. मग ठिबक सिंचन केले.  ठिबक सिंचनामुळे कमी पाण्यात त्यांना चांगले उत्पादन मिळवता आले आहे. पाण्याचा अपव्यय तर टळलाच आहे शिवाय यामुळे पीक उत्पादनात भरीव वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

सोबतच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खतांचा आणि औषधांचा डोस देखील पिकाला देण्यात आला. यामुळे संतुलित प्रमाणामध्ये खतांची आणि औषधांची मात्रा पिकाला मिळाली परिणामी पिकाची चांगली वाढ झाली. 

हे पण वाचा :- खरीप हंगामात मका पिकाच्या ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा….

गुलछडीच्या फुलांना पुणे येथील मार्केट यार्ड चांगला भाव मिळत असून यातून त्यांना चांगली कमाई होत आहे. त्यांना याआधी अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत रेकॉर्ड ब्रेक भाव गुलछडीच्या फुलांना प्राप्त झाला आहे. मात्र सध्या 70 ते 75 रुपये प्रति किलो या दरात गुलछडीचे फुले विकली जात आहेत.

यामुळे अर्धा एकर जमिनीत लागवड केलेल्या गुलछडीच्या पिकातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे धनंजय गेल्या वीस वर्षांपासून गुलछडी  फुलशेती करत आहेत आणि या पिकामुळे त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागला आहे. एकंदरीत पारंपारिक शेती नवीन पद्धतीने फुलवून या प्रयोगशील शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असं काम केल आहे.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी विकसित केलं कांदा लागवडीचे यंत्र; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा