Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

यंदा उन्हाळी कांदा शेतकऱ्यांना बनवणार मालामाल! ‘या’ कारणामुळे दरात तेजी राहू शकते, जाणकारांचा अंदाज

Summer Onion Price Hike : सध्या कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण अन समाजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांकडून राज्य शासनावर हल्लाबोल केला जात आहे. बळीराजा देखील मोठा आक्रमक झाला आहे.

Summer Onion Price Hike : सध्या कांद्याच्या मुद्द्यावरून राजकारण अन समाजकारण ढवळून निघाले आहे. विरोधकांकडून राज्य शासनावर हल्लाबोल केला जात आहे. बळीराजा देखील मोठा आक्रमक झाला आहे. आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणेल असं म्हणत बळीराजाने आपली भावना व्यक्त केली आहे. सध्या बाजारात येणाऱ्या कांद्याला पाच ते सहा रुपये प्रति किलोचा दर मिळत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे बळीराजाची मोठी आर्थिक कोंडी होत आहे. या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून कांदा अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 350 रुपये प्रति क्विंटल कांदा अनुदान 200 क्विंटल च्या मर्यादित शेतकऱ्यांना दिल जाणार आहे. एक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान राहणार आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग! स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केली मोठी भरती; ‘या’ लोकांना नोकरीची संधी, जाहिरात पहा

यासाठी तीन एप्रिल ते 20 एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज सादर करण्याचे आवाहन नुकतेच पणन महासंचालकांकडून करण्यात आले आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप हंगामातील लाल कांदा महाराष्ट्रासह उत्तरेकडील राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादित झाला, म्हणून उत्तरेकडून महाराष्ट्रातील कांद्याला मागणी राहिली नाही.

शिवाय उत्तरेकडेही मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादित झाला असल्याने देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा अधिक झाला. परिणामी कांद्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि बाजार भाव घसरले. मात्र आता उन्हाळी हंगामात कांदा समाधानकारक दरात विक्री होईल असा अंदाज आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे किड आणि रोगामुळे उन्हाळी हंगामातील कांदा उत्पादन 30 ते 40 टक्के घटणार आहे.

हे पण वाचा :- एल निनो खरच भारतीय मान्सूनवर परिणाम करणार का? यंदा दुष्काळ की सुकाळ, पहा काय म्हणताय तज्ञ

शिवाय उत्तरेकडील राज्यात उन्हाळी हंगामातील कांदा साठवण्यासाठी फारशी प्रगत तंत्रज्ञाने नाहीत. म्हणजेच आधुनिक पद्धतीने कांदा चाळी त्या ठिकाणी पहावयास मिळत नाहीत. परिणामी यावर्षी उन्हाळी कांदा दरात तेजी राहू शकते. खरं पाहता भारताच्या एकूण कांदा उत्पादनापैकी 55 ते 60 टक्के कांदा उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते.

आपल्या राज्यात कांदा पीक खरीप हंगाम (जुन-जुलै लागवड व ऑक्टोबर नोव्हेंबर काढणी), रांगडा हंगाम (जुलै-ऑगस्ट लागवड व डिसेंबर-जानेवारी काढणी) आणि रब्बी किंवा उन्हाळी हंगामात (डिसेंबर-जानेवारी लागवड व एप्रिल-मे काढणी) शेतकऱ्यांकडून घेण्यात येते. सध्या बाजारात लेटकरी हंगामातील म्हणजे रांगडा कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे. शिवाय काही ठिकाणी उन्हाळी हंगामातील कांदाही बाजारात येत आहे, पण खूपच कमी प्रमाणात.

हे पण वाचा :- मुंबई गोवा महामार्गबाबत मोठी अपडेट ! अखेर नितीन गडकरींनीच सांगितले केव्हा होणार रखडलेल काम; फोटोही केलेत शेअर

मात्र पुढील महिन्यापासून उन्हाळी हंगामातील कांद्याची आवक बाजारात वाढणार आहे. काही शेतकरी मात्र उन्हाळी हंगामातील कांद्याची मोठ्या प्रमाणात साठवणूक करतात. अधिक भाव मिळेल यामुळे शेतकऱ्यांचा कल हा साठवणुकीकडे असतो. यंदा उन्हाळी कांदा उत्पादनात घट होणार आहे, त्यामुळे दरवाढीची शक्यता तयार होत असल्याचे मत काही तज्ञांकडून वर्तवलं जात आहे.

अशा परिस्थितीत खरीप हंगामातील लाल कांद्यामुळे झालेले नुकसान उन्हाळी हंगामातील कांद्यामधून तरी भरून निघेल असा आशावाद शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान आता पुढील महिन्यापासून उन्हाळी हंगामातील कांद्याला काय भाव मिळतो? भविष्यात उन्हाळी कांद्याला चांगला भाव मिळतो का याकडे शेतकऱ्यांसहित जाणकार लोकांचे देखील बारीक लक्ष लागून राहणार आहे.

हे पण वाचा :- 1 एप्रिलपासून काय होणार महाग काय होणार स्वस्त; आताच चेक करा यादी