ब्रेकिंग ! सुरत-चेन्नई आणि रिंगरूटमध्ये जमिनी जाणाऱ्या वारसांची नावे ‘या’ तारखेला जाहीर होणार ; आता लागले मोबदल्याकडे लक्ष

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Surat Chennai Greenfield Expressway : सध्या महाराष्ट्रात मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या चर्चा रंगल्या आहेत. उद्या या महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वांचे लक्ष या ग्रॅण्ट इव्हेंट कडे लागून आहे.

असे असतानाचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावू पाहाणाऱ्यां आणि बहुचर्चीत सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे बाबत एक अति महत्त्वाच अपडेट आल आहे. या महामार्गाची आणि या मार्गाला शहराबाहेरून जोडणाऱ्या रिंगरोडची सोलापूर जिल्ह्यात मोजणी पूर्ण झाली आहे. आता यासाठी मूल्यमापनाची प्रक्रिया राबवली जात आहे.

विशेष म्हणजे या महामार्गामध्ये जमिनीच्या वारसांची नावे देखील लवकरच अधिसूचना काढून सार्वजनिक केली जाणार आहेत. या महामार्गचीं मोजणी प्रक्रिया सोलापूर व्यतिरिक्त नासिक अहमदनगर उस्मानाबाद या जिल्ह्यात सुरू आहे. मात्र यामध्ये सोलापूर जिल्ह्याने बाजी मारली असून वेगात मोजणी प्रक्रिया राबवली गेली आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे ची मोजणी प्रत्यक्षात जून महिन्यात सुरू झाली होती. जून महिन्यात सुरू झालेली ही मोजणी आता नोव्हेंबर महिन्यात संपुष्टात आली आहे. मोजणी सोलापूर जिल्ह्यातच पूर्ण झाली आहे इतर जिल्ह्यात अजून मोजणीची कामे पूर्ण असल्याचे सांगितले जात आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात 15, दक्षिण सोलापूर तालुक्यात चार, आणि अक्कलकोट तालुक्यातील सोळा अशा एकूण 35 गावातून हा महामार्ग जात आहे. सोलापूर जिल्ह्याच्या या 35 गावातून 150 किलोमीटरचा हा महामार्ग बनवला जात आहे. सुरत चेन्नई महामार्गला सोलापूर शहराच्या बाहेरून जोडल्या जाणाऱ्या सहापदरी रिंग रोडचीं देखील मोजणी झाली आहे.

दक्षिण सोलापुरातील 13 आणि उत्तर सोलापूरातील 7 अशा एकूण 20 गावातून हा महामार्ग जाणार आहे. याची लांबी 50 ते 60 किलोमीटर एवढी राहणार आहे. याची देखील मोजणी पूर्ण झाली आहे. या दोन्ही महामार्गासाठी जमिनी गेलेल्या वारसांची यादी आता येत्या काही दिवसात पुढे येणार आहे. यामुळे जमिनीच्या मोबदल्यात किती भरपाई मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

रेडीरेकनरनुसार म्हणजेच चालू वर्तमान बाजार मूल्येनुसार किती नुकसान भरपाई मिळते याकडे महामार्गात जमिनी जाणाऱ्यांचे लक्ष लागून आहे. याबाबत अरुणा गायकवाड उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरत-चेन्नई आणि रिंग रोड महामार्गाची मोजणी पूर्ण झाली आहे.

याच्या आधीसूचना जारी करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. शिवाय वारसाना मिळणाऱ्या नुकसान भरपाईचे दर देखील निश्चित केले जात आहेत. एकंदरीत डिसेंबर मध्ये अधिसूचना येईल आणि त्यानंतर या महामार्गासाठी आवश्यक पुढील प्रक्रिया सुरु होणार आहे.