राज्य सरकारच्या ‘या’ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड ! सरसकट मिळणार 6 हजार बोनस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : सध्या दिवाळी सुरू झाली असून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचारीच नाही तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना देखील बोनस जाहीर केला जातो. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना बोनसची अपेक्षा असते.

खाजगी क्षेत्राचा विचार केला तर अनेक भेटवस्तू देखील कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना देखील राज्य सरकार असो वा केंद्र सरकार यांच्यामार्फत बोनसची निश्चित रक्कम ही जाहीर केली जाते.

अगदी याच पद्धतीने जर आपण महाराष्ट्र राज्य सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांच्या करिता राज्य सरकारच्या माध्यमातून बोनस जाहीर करण्यात आलेला आहे व त्याविषयीचे अपडेट आपण या लेखात बघणार आहोत.

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार सरसकट सहा हजारांचा बोनस

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य सरकारच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जावी म्हणून त्यांना सरसकट 6000 रुपयांचा दिवाळी बोनस देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे.

मागच्या वर्षी एसटी कर्मचारी व अधिकारी यांना पाच हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्यात आला होता व यावर्षी मात्र त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ करत सहा हजार रुपये इतका दिवाळी बोनस देण्यात येणार आहे.

सरकारने जाहीर केला दिवाळी बोनस परंतु कर्मचारी मात्र असमाधानी

राज्य सरकारच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांकरिता सहा हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. परंतु सरकारने जाहीर केलेली बोनसची रक्कम पुरेशी नसून कर्मचारी त्यामुळे नाराज झालेले आहेत. सरकारने जाहीर केलेल्या बोनसच्या या रकमेमुळे कर्मचाऱ्यांचे समाधान झालेले नाही.

सिडकोच्या कर्मचाऱ्यांना मिळाला बंपर बोनस

त्या तुलनेमध्ये जर आपण सिडकोच्या कर्मचाऱ्यांचा विचार केला तर त्यांना बंपर बोनस मिळाला असून तब्बल पन्नास हजारांचा बोनस त्यांच्याकरिता जाहीर करण्यात आलेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सिडको प्रशासनाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना 50 हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे महामंडळांमध्ये हा सर्वात जास्त बोनस आहे. सिडको कर्मचाऱ्यांना मिळालेल्या या घसघशीत बोनस मुळे सिडकोच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अतिशय जोरदार साजरी होणार आहे.