Diwali Festival 2023 :- भारतातील आणि हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणून दिवाळी या सणाचा उल्लेख केला जातो. संपूर्ण भारत वर्षात हा सण फार मोठ्या धामधुमीत आणि प्रसन्नतेने साजरा केला जातो.
या कालावधीमध्ये अनेक प्रकारचे शुभ मुहूर्त असल्यामुळे सोने-चांदीचे दागिने तसेच वाहन खरेदी करण्याकडे देखील बऱ्याच लोकांचा कल असतो. तसेच एखाद्या व्यवसायाची किंवा नवीन कामाची सुरुवात देखील या कालावधीमध्ये केली जाते.
तसेच घरामध्ये लक्ष्मी नांदावी व भरभराट व्हावी या दृष्टिकोनातून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अशा अनेक अंगांनी महत्त्वाचे असलेल्या दिवाळीच्या सणामधील एक महत्त्वाची बाब म्हणजे अभ्यंगस्नान हे होय.
या कालावधीत अभ्यंगस्नानाला देखील खूप महत्त्व आहे. यावेळी जर तुम्ही पाण्यामध्ये जर तिळाचे तेल टाकले तर शरीरासाठी व उत्तम आरोग्या करिता ते खूप महत्त्वाचे आहे. या लेखांमध्ये याविषयीचेच महत्त्वपूर्ण माहिती घेणार आहोत.
आंघोळीच्या पाण्यात टाका तिळाचे तेल
आंघोळ करण्यासाठी जास्त गरम पाणी न घेता कोमट पाणी घ्यावे. या पाण्यामध्ये दोन थेंब तिळाचे तेल टाकावे. कारण तिळाच्या तेलाने स्नान करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असून हिवाळ्याच्या कालावधीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर हिवाळ्यामध्ये शरीरातील उष्णता वाढण्यास व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तिळाच्या तेलाची अंघोळ खूप मदत करते. तसेच हिवाळ्यामध्ये बऱ्याचदा सर्दी खोकल्याचा त्रास जाणवतो.
या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी देखील तिळाचे तेल खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्ही जर तिळाचे तेल दोन थेंब पाण्यात टाकून जर आंघोळ केली तर तुम्ही हिवाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या संसर्गजन्य आजारांना बळी पडू शकणार नाहीत.
तसेच हे दाहक विरोधी असल्यामुळे हाडातील सांध्यांना देखील यामुळे आराम मिळतो. ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवात यासारख्या त्रासापासून देखील आराम मिळतो. तसेच अशा पद्धतीने आंघोळ केल्यामुळे हाडांना आराम मिळतो व हायड्रेशन वाढते व हाडांमधील घर्षण कमी होण्यास मदत होते.
तसेच तिळाच्या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट व जीवनसत्वाचे प्रमाण चांगले असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील ते फायदेशीर आहे. या तेलामध्ये असलेली अँटिऑक्सिडंट हे तुमचे अनेक आजारांपासून रक्षण करतात.
तसेच तिळाचे तेल हे बॅक्टेरिया वाढीस देखील प्रतिबंध करणारे असल्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास यामुळे मदत होते. तिळाचे तेल हे मॉइश्चरायझिंग एजंट असल्यामुळे ते त्वचेला साफ करण्याकरिता देखील मदत करते.