Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

मोठी बातमी ! तलाठी भरती केव्हा होणार? महसूलमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली, पहा….

Talathi Bharati 2023 : महाराष्ट्रातील तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या तमाम उमेदवारांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर येत आहे. वास्तविक गेल्या काही महिन्यांपासून तलाठी भरतीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. राज्य शासनाने राज्यात लवकरच तलाठी भरती आयोजित होईल अशी घोषणा देखील केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

मात्र अजूनही तलाठी भरतीला मुहूर्त लागला नसल्याने तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये मोठी निराशा पाहायला मिळत आहे. अशातच आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तलाठी भरती संदर्भात एक मोठी माहिती सार्वजनिक केली आहे.

हे पण वाचा :- नागरिकांनो सावधान ! ‘या’ भागात पुन्हा वादळी पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा

महसूल मंत्री विखे पाटील यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार आगामी तीन महिन्यात तलाठी भरतीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मंत्री महोदय यांनी यावेळी सांगितले की, आगामी तीन महिन्यात राज्यातील 4200 रिक्त तलाठ्यांची पदे भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरले जाणार आहेत.

विशेष म्हणजे यामध्ये नाशिक विभागातील पाचशे तलाठ्यांचा समावेश राहणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. याच योजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शासन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त राज्यात 75 हजार पदांची भरती करणार आहे. 

हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबईहुन पुणे, सोलापूरमार्गे धावणार ‘ही’ स्पेशल ट्रेन, कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार? पहा….

यामध्ये 4200 तलाठ्यांच्या रिक्त पदांचा देखील समावेश आहे. खरं पाहता, नोव्हेंबर 2022 मध्येच तलाठी भरती अपेक्षित होती. मात्र पेसा क्षेत्रातील पदांमुळे ही भरती रखडली होती. आता मात्र तलाठी भरतीसाठी नव्याने आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

भरती प्रक्रिया पारदर्शक बनवण्यासाठी भरतीला विलंब होत असल्याचे मंत्री महोदय यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. एकंदरीत महसूल मंत्री विखे पाटील यांनी पुढील तीन महिन्यात तलाठी भरती होणार असल्याची माहिती दिली असल्याने या भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना या निमित्ताने मोठा दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा :- 12वी पास तरुणांसाठी देशसेवेची सुवर्णसंधी ! BSF मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, 21 मे पर्यंत इथं करा अर्ज