अलीकडच्या कालावधीमध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने सादर करण्यात आली आहेत व यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर पासून तर कार पर्यंतचा समावेश आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोनातून अशा प्रकारे इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
याशिवाय पेट्रोल आणि डिझेल आणि इलेक्ट्रिक कार नंतर आता बऱ्याच कंपन्या सीएनजी कार निर्मितीकडे देखील वळल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या दृष्टिकोनातून जर आपण टाटा मोटर्स या भारतीय बाजारपेठेतील वाहन उत्पादक कंपनीचा विचार केला तर ही एक महत्वाची व प्रसिद्ध असलेली कंपनी असून आज पर्यंत टाटा मोटर्सच्या माध्यमातून अनेक व्यावसायिक वाहनांपासून तर प्रवासी वाहनांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

आजपर्यंत या कंपनीने अनेक पेट्रोल व डिझेल व त्यासोबतच इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत आणले आहेत.आता अलीकडेच कंपनीने नवी कार टाटा नेक्सन भारतीय बाजारपेठेमध्ये सादर करणार असून ते सीएनजी मॉडेल आहे व या कारमध्ये कंपनीच्या माध्यमातून अनेक प्रकारची वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. तसेच या कारचे इंजिन देखील उत्कृष्ट कामगिरी पार पाडणारे आहे.
कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे मॉडेल या आर्थिक वर्षात लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी जर कुणाला चार चाकी वाहन खरेदी करायचे असेल तर टाटा मोटरचा हा एक नवीन पर्याय नक्कीच फायद्याचा ठरू शकतो.
कधी लॉन्च होऊ शकते टाटाची ही कार?
सध्या या मॉडेलचा फक्त टीझर बाजारामध्ये आला असून कंपनीने अद्याप या कारच्या लॉन्च तारखेबाबत कुठल्याही प्रकारची घोषणा केलेली नाही. परंतु असे बोलले जात आहे की ही कार 2024 च्या शेवटच्या महिन्यात किंवा 2025 च्या सुरुवातीला लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे.
काय असतील Tata Nexon CNG ची वैशिष्ट्ये?
कंपनीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या मॉडेलमध्ये तुम्हाला अनेक उत्कृष्ट फीचर्स पाहायला मिळतील. जसं की यामध्ये तुम्हाला वाय पॅटर्न एलईडी टेललाईट आणि आकर्षक असे हेडलाईट देखील पाहायला मिळतील. तसेच टाटाच्या या सीएनजी मॉडेलमध्ये ऑटोमॅटिक फ्युएल स्विचिंग आणि सिस्टम कंट्रोल तसेच प्रगत ईसीयू लिक डिटेक्शन सिस्टिम सारखे वैशिष्ट्ये देखील मिळतील.
कसे असेल या कारचे इंजिन?
जर आपण या कारच्या इंजिन बद्दल बोललो तर या मॉडेलमध्ये एक उत्कृष्ट सीएनजी किट दिले जात आहे. त्यामध्ये तुम्हाला 1.5 लिटर नॅचरल एस्पीरेटेड इंजिन मिळेल. या इंजिन मध्ये 87 बीएचपी पावर आणि 121 एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. एवढेच नाही तर टाटाच्या या सीएनजी मॉडेल मध्ये तुम्हाला टर्बो इंजिनची अनेक उत्तम वैशिष्ट्ये देखील मिळतील.