Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

टाटा है तो सब मुमकिन है ! टाटाच्या ‘या’ शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे लवकरच बनणार धनवान; कारण की…..

Tata Share Market : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी एक अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी म्हणजे या आठवड्यामध्ये शेअर बाजारांमधील सर्व कंपन्या चौथ्या तिमाहीचे निकाल सार्वजनिक करणार आहेत.

Tata Share Market : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी एक अति महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी म्हणजे या आठवड्यामध्ये शेअर बाजारांमधील सर्व कंपन्या चौथ्या तिमाहीचे निकाल सार्वजनिक करणार आहेत. यामुळे आता याकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष लागून आहे. दरम्यान, काही तज्ञांनी टाटा कंपनीच्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चा शेअर लवकरच मोठी गरुड झेप घेणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यामुळे गुंतवणूकदार लवकरच मालामाल बनतील असा दावा केला जात आहे. खरं पाहता टाटा  समूहाच्या सर्वच स्टॉकला गुंतवणूकदार व्यक्तींकडून मोठी पसंती दर्शवली जाते. टाटाचे स्टॉक हे विश्वसनीय स्टॉक म्हणून गुंतवणूकदार यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. परंतु टाटा कन्सल्टन्सीचे शेअर अमेरिकेत सुरू झालेल्या बँकिंग क्षेत्रातील अस्थिरतेमुळे तसेच युरोपियन देशात वाढलेल्या महागाईमुळे चांगलेच बिथरले आहेत.

हे पण वाचा :- पदवीधर उमेदवारांसाठी खुशखबर; पर्यटन संचालनालयात ‘या’ पदासाठी भरती सुरू, पहा डिटेल्स

टाटा कन्सल्टन्सीच नाही तर आयटी क्षेत्रातील बहुतांशी कंपन्यांचे शेअर्स हे खाली आले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. मात्र अशातच टाटा कन्सल्टन्सी चे शेअर्स वाढणार असल्याचा दावा केला जात आहे. मंदीच्या काळात देखील हा शेअर गुंतवणूकदारांची चांदी करणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देशातील सुप्रसिद्ध ब्रोकरेज फर्म IDBI कॅपिटल मार्केट्सने टाटाच्या या कंपनीमध्ये आगामी काळात मोठी झेप घेण्याची क्षमता असल्याचा दावा केला आहे. या ब्रोकरेज फर्म ने केलेल्या दाव्यानुसार टाटा कन्सल्टन्सी कंपनीचे शेअर्स 3615 रुपये एवढ्या उच्चांकी पातळीवर जाऊ शकतात. यामुळे या ब्रोकरेज फर्मने टाटा कन्सल्टन्सी च्या स्टॉकला होल्ड रेटिंग या ठिकाणी दिली आहे.

हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी खुशखबर; पुण्यात ‘या’ ठिकाणी आहे नोकरीची संधी, इथे पाठवा अर्ज

वास्तविक पाहता या वर्षात टाटा कन्सल्टन्सीच्या शेअरमध्ये 1.30 टक्क्यांची घसरण झाली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षांपूर्वी टीसीएसचे शेअर खरेदी केले असतील त्यांना तब्बल 12% हुन अधिकचे नुकसान या शेअर्समुळे झाले आहे. हाती आलेल्या एका आकडेवारीनुसार, TCS चा 52 आठवड्यांचा उच्चांक 3809.30 रुपये प्रति शेअर इतका आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 2926.10 रुपये प्रति शेअर इतका आहे.

दरम्यान, या कंपनीचे शेअर घसरलेले असतानाही तज्ञ लोकांनी या कंपनीचे शेअर लवकरच वधारतील आणि गुंतवणूकदार मालामाल बनतील असा दावा केला असल्याने खरंच टीसीएस कंपनीचे शेअर वाढतात का आणि गुंतवणूकदारांना यामुळे फायदा होतो का याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.

हे पण वाचा :- कलिंगड शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा; 10 गुंठ्यातला प्रयोग ठरला लाख मोलाचा, पहा ही यशोगाथा