Thai Magur Fish: मातीवर देखील चालतो थाई मागुर मासा! परंतु भारतात आहे बंदी, वाचा कारणे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thai Magur Fish :- भारतामध्ये अनेक प्रजातीचे मासे असून यातील काही खाऱ्या पाण्यातील प्रजाती आहेत तर काही गोड्या पाण्यात चांगल्या वाढणाऱ्या प्रजाती यांचा समावेश होतो. या सगळ्या प्रजातींमध्ये जर आपण मागुर माशाची प्रजात पाहिली तर ती भारतात खूप प्रसिद्ध आहे. या जातीच्या माशाला लांब मिशा असतात म्हणून त्याचा कॅट फिश मध्ये समावेश केला गेला आहे. तसेच या मासाची खायला लागणारी उत्तम चव देखील प्रसिद्ध आहे.

परंतु यापैकी जर आपण विदेशी थाई मागूर प्रजातीच्या माशाचे वैशिष्ट्य पाहिले तर याचे संवर्धन भारतात देखील केले जाते. परंतु हा काही दृष्टिकोनातून मानवी आरोग्याला हानिकारक आहे. या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मातीवर देखील चालतो व पाण्याशिवाय बराच काळ जिवंत राहू शकतो. कमीत कमी कालावधीमध्ये चांगली वाढ होणारा हा मासा आहे. परंतु तरीदेखील या माशावर भारतात बंदी आहे.

 थाई मागुर माशावर भारतात बंदी असण्याची कारणे

या माशाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा मांसाहारी देखील आहे व वनस्पतींचे पाने देखील खातो. तसेच इतर प्रजातीच्या माशांना देखील खायला मागे पुढे पाहत नाही. त्याच्या ही सवय देखील हानिकारक आहे. तसेच थाई मागुर मासा हा जलीय परिसंस्था मधील जे काही घटक असतात त्यांच्याकरिता हानिकारक आहे. दुसरे म्हणजे हा मासा बऱ्याचदा अजैविक अशा कचऱ्याला देखील खातो.

त्यामुळे या माशाच्या मांसामध्ये अनेकदा जड धातू उदाहरणच घ्यायचे झाले तर कॅडमियम तसेच आरसेनिक यांचे संक्रमण सुद्धा दिसून आलेले आहे. हे धातू मानवी आरोग्या करता हानिकारक असल्यामुळे 1997 मध्ये केंद्रीय कृषिमंत्रालयाच्या  मासेमारी विभागाच्या माध्यमातून या माशावर बंदी घालण्यात आलेली होती. याचा रंग हिरवट तांबूस असतो व याचे डोके चपटे असते व जबडा देखील चपटा असतो. याच्या पाठीवरील जे काही पर असतात ते लांब असतात व शेपटी पराशी जोडलेली असते.

या माशाच्या अंगावर खवले नसतात. पाण्याच्या तळाशी राहणारा हा मासा तलावातील किडे तसेच छोटे मासे खातो. मागुर माशाची मादी तलावाच्या किनाऱ्याजवळ घरटे करते व त्यामध्ये अंडी घालते. तसेच थाई मागुर माशाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पाण्याच्या वरच्या भागावर येऊन श्वसन करण्याकरिता या माशांमध्ये विशिष्ट असे श्वसन इंद्रिय असतात. त्यामुळे हा शोषणाकरिता पाण्याच्या वरच्या भागावर म्हणजेच पृष्ठभागावर येत असतो.

तसेच हवेमध्ये शोषण करण्याची क्षमता असल्यामुळे व पाण्यात कमी ऑक्सिजन राहिला तरी जिवंत राहण्याची क्षमता असल्यामुळे माशांच्या संवर्धनाकरिता खूप उपयुक्त आहे. साधारणपणे याची लांबी 45 सेंटीमीटर पर्यंत वाढू शकते. हा एक ते पाच किलो पर्यंत देखील वजनाचा होऊ शकतो. तसेच या माशांमध्ये खनिजे, लोह व प्रथिने यांचे प्रमाण जास्त असते व मेदाचे प्रमाण अत्यंत कमी असते. या चांगल्या व औषधी गुणांमुळे त्याला न्यूट्रिशियस मासा म्हणून देखील ओळखले जाते.