Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

ठाणे महानगरपालिकेत मोठी भरती; दहावी पास तरुणांना नोकरीची संधी, थेट मुलाखतीने होणार निवड, पहा संपूर्ण जाहिरात

Thane Mahanagarpalika Job 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आज आम्ही एक मोठी खुशखबर घेऊन नजर झालो आहोत. जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच नोकरी संदर्भात माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण ठाणे महानगरपालिकेने काढलेल्या भरतीच्या जाहिराती संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही आपणास सांगू इच्छितो की ठाणे महानगरपालिकाने अटेंडंट या पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नुकतीच अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील अटेंडंट या संवर्गातील रिक्त पदांची जागा भरली जाणार आहे.

या भरतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या भरतीच्या माध्यमातून थेट मुलाखती घेऊन उमेदवाराची निवड केली जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी कोणतीच लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. दरम्यान आता आपण नेमक्या किती रिक्त जागा आहेत आणि यासाठी मुलाखत कुठे होणार आहे आणि शैक्षणिक पात्रता काय राहणार याविषयी जाणून घेऊया.

हे पण वाचा :- सातारा, मुंबईकरांसाठी खुशखबर! नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग तयार होणार, ‘असा’ असणार रूटमॅप, नितीन गडकरी घेणार मोठा निर्णय

किती आहेत रिक्त जागा

अटेंडेंट पदाच्या एकूण 24 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय 38 राहणार आहे. तसेच मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वय 43 वर्षे राहणार आहे. यासाठी दहावी पास उमेदवार पात्र राहील मात्र संबंधित उमेदवाराने शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये म्हणजेच पोस्टमार्टम संबंधित काम केलेले असणे आवश्यक आहे.

याचा संबंधित उमेदवाराला किमान तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. सोबतच या पदासाठी अर्ज करणाऱ्यां उमेदवारास कम्प्युटरच बेसिक नॉलेज असणे गरजेचे आहे यासाठी ट्रिपल सी किंवा एमएससीआयटी सारखे कोर्सेस संबंधित उमेदवाराने केलेले असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदारास मराठी भाषा अवगत असणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव तयार; ‘इतका’ वाढणार DA, पहा पगारात किती वाढ होणार?

मुलाखत कधी आणि कुठे होणार?

या भरतीच्या माध्यमातून थेट मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड होणार आहे. मुलाखत ही 12 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी कैलासवासी अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे या ठिकाणी हजर राहायचे आहे. 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11 वाजता ही मुलाखत सुरू होणार आहे.

किती मिळणार मानधन

अटेंडेंट या पदासाठी दरमहावीस हजार रुपये मानधन या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवाराला दिले जाणार आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा एप्रिल महिन्यातील हवामान अंदाज; ‘हे’ सहा दिवस पडणार मुसळधार पाऊस !

जाहिरात पाहण्यासाठी इथं क्लिक करा