ठाणे वासियांना मोठं गिफ्ट ! ‘या’ ठिकाणी उभारल जाणार नवीन रेल्वे स्टेशन; असा होईल फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane News : ठाणे वासियांना लवकरच एक मोठ गिफ्ट मिळणार आहे. खरं पाहता ठाणे ते मुलुंड दरम्यान नवीन ठाणे रेल्वे स्टेशन उभारल जाणार होत. यासाठी ठाणे मेंटल हॉस्पिटलच्या 72 एकरापैकी 14.83 एकर जागा लागणार होती.

मात्र, यावर स्थगिती देण्यात आली होती. परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच जारी केलेल्या आपल्या एका निकालात या जागेवर असलेली स्थगिती उठवली आहे. यामुळे आता रुग्णालयाजवळील 14 एकर जागा या प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी आता नवीन ठाणे रेल्वे स्टेशन उभारल जाणार आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे नवीन ठाणे रेल्वे स्टेशनच्या कामाला गती मिळणार आहे. या नवीन रेल्वे स्टेशन मुळे ठाणे आणि आणि मुलुंड रेल्वे स्टेशनवर होणारी गर्दी कमी होणार आहे. प्रवाशांची संख्या यामुळे विभाजली जाईल आणि साहजिकच वाहतुकीला देखील चालना मिळेल.

खरं पाहता हे नवीन ठाणे रेल्वे स्टेशन गेल्या आठ वर्षांपूर्वी प्रस्तावित करण्यात आले होते. ठाणे रेल्वे स्टेशनचे की देशातील सर्वात जुन्या रेल्वे स्टेशन पैकी एक आहे यावर रोजाना सहा ते सात लाख प्रवासी येतात. यामुळे ठाणे ते मुलुंड दरम्यान एक नवीन रेल्वे स्टेशन उभारल जावं अशी मागणी देखील केली जात होती. याच पार्श्वभूमीवर या नवीन रेल्वे स्टेशनचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र या प्रकल्पाला जी 14 एकर जागा लागणार होती ती ठाणे मेंटल हॉस्पिटलच्या हद्दीतली होती.

यावर स्थगिती लावण्यात आली होती. मात्र आता ही स्थगिती उठवली गेली आहे. यामुळे आता आरोग्य विभागाकडून रुग्णालयाच्या हद्दीतील जागा मध्य रेल्वे कडे सुपूर्त झाल्यानंतर लगेचच या स्टेशनचे काम सुरू होणार आहे. मध्य रेल्वेने या नवीन रेल्वे स्टेशनच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे.

हा प्रकल्प ठाणे महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत उभारला जाणार असून यासाठी 289 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निश्चितच या नवीन ठाणे रेल्वे स्टेशन मुळे ठाणे आणि मुलुंड स्टेशनवर होणारी गर्दी कमी होईल आणि प्रवाशांना दिलासा मिळेल असा आशावाद आता व्यक्त होत आहे.