आनंदाची बातमी ! आता ठाण्यातून मुंबई, पुणे, नाशिक प्रवास करणे होणार सोपं; ‘या’ नवीन रस्त्यांसाठी हालचाली वाढल्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane News : सध्या राज्यभर वेगवेगळे रस्ते विकासाची कामे केली जात आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच मुंबई व उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी देखील वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ठाणे शहरातही वेगवेगळे रस्ते प्रकल्प सुरू आहेत. ठाणे हे एक महत्वाचे आणि जुने शहर असून या शहरातूनच नाशिक, पुणे, मुंबई या तिन्ही महानगराकडे जावे लागते.

नासिक, पुणे, आणि मुंबई या तिन्ही शहरांची लोकसंख्या पाहता ठाणे शहरात या तिन्ही शहराकडे जाणारी वाहने कायमच गर्दी करत असतात. अहमदाबादमधून पुणे आणि नासिक कडे जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये येतात. यासाठी प्रवासी घोडबंदर रस्त्याचा उपयोग करत असतात. परिणामी हा घोडबंदर रस्ता कायमच गर्दीने भरलेला असतो. वाहनांची चिकार गर्दी यामुळे वाहतूक कोंडीची समस्या इथे सामान्य बाब आहे.

हे पण वाचा :- पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर वासियांसाठी महत्वाची बातमी! 31 मार्चपर्यंत ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद, काय राहणार कारण?, पहा

वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना आपला अनमोल वेळ प्रवासातच घालावा लागतो. विशेषता या रस्त्यावरील गायमुख ते कासारवडवली हा भाग इतर रस्त्याच्या तुलनेत कायमच वाहनांच्या गर्दीने तुंब असतो. दिवसातून किमान पाच ते सहा घंटे या टप्प्यात वाहतूक कोंडी पाहायला मिळते. साहजिकच यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय अलीकडे होऊ लागली आहे.

या रस्त्यावर प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत करणे अस आता प्रवासी बोलू लागले आहेत. दरम्यान आता एम एम आर डी ए म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने यावर एक रामबाण उपाय शोधला आहे.

हे पण वाचा : इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला ठोकला रामराम! तरुणाने सुरु केली ‘या’ जातीची पेरूची शेती; अन मिळवले लाखोंची कमाई

आता मुंबई मेट्रोपोलीटन रिजन डेव्हलपमेंट ऑथोरिटी घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेत आहे. यामध्ये टेकडी पायथा रस्त्याचे देखील नियोजन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. एमएमआरडीएने एका प्रतिष्ठित मिडिया रिपोर्टला दिलेल्या माहितीनुसार, हा रस्ता साधारण 2.2 किमी लांबीचा तयार केला जाणार आहे. ठाणे-बोरिवली टेकडी म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ठाणे बाजूकडील डोंगराच्या पायथ्याशी हा रस्ता तयार करण्याचे नियोजन प्राधिकरणाने हाती घेतले आहे.

हा रस्ता प्रामुख्याने डोंगरीपाडा, ओवळे, गोवनीवाडा, भाईंदरपाडा ते गायमुख या परिसराला जोडला जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे घोडबंदर रस्त्याच्या पश्चिमेकडे, आत राहणाऱ्यांना ठाणे शहर गाठण्यासाठी किंवा नाशिक, पुणे दिशेने जाण्यासाठी किमान तीन किमी लांबीवरील घोडबंदर रस्ता टाळता येणं शक्य होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

साहजिकच यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटेल आणि इनडायरेक्ट याचा परिणाम घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीवर दिसेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे. एकंदरीत यामुळे प्रवास गतिमान होण्यास मदत मिळणार आहे.

हे पण वाचा :- सोयाबीनची आवक विक्रमी घटली; भाव वाढीचे संकेत की अन्य कारण? पहा