ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त 20 मिनिटात; भूमिगत मार्गाच्या वाढीव खर्चास प्राधिकरणाची मान्यता, केव्हा सुरु होणार काम? पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Thane News : सध्या राज्यभर वेगवेगळी रस्ते विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत सर्वत्र दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी रस्त्यांची उभारणी जोमात सुरू आहे. या वेगवेगळ्या प्रकल्पांच्या कामाला आगामी वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पाहता अधिक गती देण्याच्या सूचना देखील शासनाकडून येत आहेत. मुंबई शहर व उपनगरात देखील वेगवेगळी रस्ते विकासाची कामे सद्यस्थितीला सुरू आहेत.

यामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला आणि आत्ता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे सुपूर्द केलेला ठाणे ते बोरिवली दरम्यान तयार होत असलेल्या भूमिगत मार्गाचाही समावेश आहे. आता या भूमिगत मार्गाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. वास्तविक हा प्रकल्प राज्य रस्ते विकास महामंडळाचा होता मात्र हा प्रकल्प नंतर एम एम आर डी ए कडे सुपूर्द करण्यात आला आहे. एमएमआरडीए ने प्रकल्प हाती घेतल्यानंतर या प्रकल्पामध्ये काही मूलभूत बदल केले आहेत.

त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला असल्याची माहिती समोर आली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या ठाणे बोरिवली भूमिगत मार्गासाठी 11,235 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता पण आता यामध्ये वाढ झाली असून प्रकल्पाचा खर्च 16600 कोटी रुपयांवर गेला आहे. विशेष म्हणजे या वाढीव खर्चास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता मिळाली आहे. म्हणून आता जून महिन्यापासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये देण्यात आली आहे.

हे पण वाचा :- चर्चा तर होणारच! शेतकऱ्याने कांद्याच्या शेतात उभारली अनोखी गुढी; बळीच राज्य येऊ दे! म्हणतं शासनाकडे घातलं साकडं

प्रकल्पाचा खर्च वाढण्याचे कारण

ठाणे ते बोरिवली दरम्यान होत असलेल्या या भूमिकत मार्गामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास मात्र वीस मिनिटात होणार आहे. यामुळे ठाणे आणि बोरिवली वासियांना या प्रकल्पाचे वेध लागले आहे. वास्तविक या प्रकल्पाच्या खर्चात आता 5000 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ होण्यामागे प्रकल्पाच्या मूलभूत आराखड्यात बदल कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, एम एम आर डी ए च्या माध्यमातून बोगद्याकडे जाणे-येणे सोपे व्हावे यासाठी ठाण्याच्या दिशेने घोडबंदर रस्त्यावर अंदाजे 700 मीटर लांबीचा उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे. तसेच अंदाजे 500 मीटरचा भुयारीमार्ग देखील बनवला जाईल अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय बोरिवलीच्या दिशेने 850 मीटर लांबीचा भुयारीमार्ग विकसित होत आहे.

यासोबतच हे काम करतांना काही विशेष सोयी सुविधा बोगद्यामध्ये इन्स्टॉल केल्या जाणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा, विद्युत यंत्रणा, तसेच ‘ओपन रोड टोलिंग’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती एका मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून हाती आली आहे. तसेच या दुहेरी बोगद्यात प्रत्येक 300 मीटर अंतरावर पादचारी क्रॉस पॅसेज राहणार आहेत.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या ‘त्या’ 14 बाजार समिती निवडणुकीचा बिगुल वाजला ! 27 ला उमेदवारी अर्ज, ‘या’ दिवशी पार…

शिवाय या प्रकल्पाचे काम वेगवान करण्यासाठी देखील हालचाली तेज झाले आहेत. बोगद्याच्या कामासाठी आता दोन मशीन ऐवजी चार मशीन वापरल्या जाणार आहेत. याचे बांधकाम एकूण दोन टप्प्यात होणार असून बांधकामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. 4 एप्रिल पर्यंत ही टेंडरची प्रक्रिया पूर्ण करून जून महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.

कामाला सुरुवात झाल्यानंतर मात्र पाच वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे टार्गेट प्राधिकरणाने ठेवले आहे. या बोगद्याचे बांधकाम जरी दोन टप्प्यात होत असलं तरी देखील बोगद्याचे एकूण काम तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात बोरिवलीच्या बाजूच्या बोगद्याचे, दुसऱ्या टप्प्यात ठाण्याच्या बाजूच्या बोगद्याचे काम करण्यात येईल. तिसऱ्या टप्प्यात टोल यंत्रणेसह अन्य कामे करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

निश्चितच या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हा प्रवास सोयीचा होणार असून यामुळे प्रवाशांचा मोठा वेळ वाचणार आहे. दरम्यान प्राधिकरणाच्या माध्यमातून हा प्रकल्प मात्र पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आखण्यात आले असल्याने निश्चितच पुढील पाच वर्षात म्हणजेच 2018 पर्यंत हा प्रकल्प ठाणे आणि बोरिवली वासियांसाठी खुला होईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- Breaking News : अहमदनगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ लाख रेशन कार्ड धारकांना मिळणार ‘हा’ मोठा लाभ ! 1…