Thane News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई शहरातील आणि उपनगरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे ते बोरिवली दरम्यानचा प्रवास सुसाट करण्यासाठी दुहेरी बोगदा विकसित करण्याच्या प्रकल्पाचा देखील समावेश आहे. बोगदा विकसित झाल्यानंतर ठाणे ते बोरिवली चा प्रवास मात्र 15 मिनिटात पार होणार आहे. अशातच आता या बोगद्याच्या कामासंदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे.
हे पण वाचा :- पुण्यातील शेतकऱ्याचा शेतीतला नवखा प्रयोग; चिया शेतीतून साधली आर्थिक प्रगती, काही महिन्यातच बनले लखपती, पहा…..
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या दोन्ही उपनगरातील अंतर कमी करण्यासाठी हा 11.84 किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा विकसित केला जात आहे. वास्तविक या प्रकल्पा अंतर्गत दोन 10.8 किमी लांबीचे बोगदे राहणार आहेत आणि दोन्ही टोकांना एकत्रित 1 किमीचे मार्ग उपलब्ध राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एका बोगद्यात तीन लेन अशा या दुहेरी बोगद्यात एकूण सहा लेन राहणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही बोगद्यामध्ये इमर्जन्सीच्या परिस्थितीत एन्ट्री करण्यासाठी सुविधा राहणार आहे.
हे पण वाचा :- पंजाबराव डख हवामान अंदाज; हवामानात अचानक झाला मोठा बदल, 21 एप्रिलपासून पुन्हा ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार ! पहा….
कुठं उभारले जात आहेत हे बोगदे?
बोरिवलीतील मागाठाणेचा एकता नगर आणि ठाण्यातील मानपाडा येथील टिकुजी-नी-वाडी या दरम्यान हे बोगदे विकसित होत आहेत. सध्या बोरिवली मधील मागाठाणे ते टिकुजी नी वाडी हे अंतर पार करण्यासाठी जवळपास एका तासाचा कालावधी प्रवाशांना खर्च करावा लागत आहे. मात्र हा बोगद्यांचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हे अंतर केवळ पंधरा मिनिटात पार केले जाऊ शकते असं मत तज्ञ व्यक्त करत आहेत. साहजिक बोरिवली आणि ठाण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प अति महत्त्वाचा आहे.
हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी विभागात निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 32 हजार, पहा….
केव्हा पूर्ण होणार हे काम?
मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवलीपासून 5.75 किमीपर्यंत दुहेरी बोगदे बांधणे आणि ठाण्याच्या टोकापासून प्रत्येकी 6.09 किमी. अंतराचे बोगदे बांधण्याचे काम पुढील चार वर्षांत केले जाणार आहे. म्हणजे या बोगद्यांचे एकत्रित काम होणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील चार वर्षात हे काम पूर्ण होईल म्हणजेच 2027 पर्यंत एकाच वेळी या बोगद्याचे काम होणार आहे. अर्थातच 2027 मध्ये हा प्रकल्प पूर्णपणे बांधून तयार होईल आणि बोरिवली ते ठाणे हा प्रवास त्यावेळी 15 मिनिटात करता येणे शक्य होईल अशी माहिती दिली जात आहे.
हे पण वाचा :- अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, सांगली, सोलापूर अन ‘त्या’ जिल्ह्यात वादळी पाऊस पडणार ! हवामान विभागाची चेतावणी