Amrut Bharat Train :- केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून अनेक रेल्वे मार्गांचे काम सुरू आहे व वेगवेगळ्या मार्गांवर रेल्वे देखील सुरू करण्यात येत आहेत.
यामध्ये प्रवाशांना जास्तीत जास्त आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव यावा याकरिता वंदे भारत एक्सप्रेस भारतामध्ये विविध मार्गांवर चालवल्या जात आहेत. आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रात देखील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव( गोवा) आणि नागपूर ते बिलासपुर इत्यादी मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
परंतु याव्यतिरिक्त आता देशामध्ये अमृत भारत ट्रेन देखील धावण्यासाठी तयार झाली असून या ट्रेनची चाचणी पूर्ण करण्यात आलेली आहे. या लेखात आपण अमृतभारत ट्रेन नेमकी काय असते व तिचे फायदे काय? इत्यादी बद्दल माहिती घेणार आहोत.
कशी असते अमृतभारत ट्रेन?
देशातील पहिली वहिली अमृतभारत ट्रेन आता प्रवासाकरिता तयार झाली असून तिची ट्रायल पूर्ण करण्यात आलेली आहे. ही ट्रेन पूल पुश ट्रेन असून वंदे भारत एक्सप्रेस सारखी ही कमी वेळामध्ये वेग धरते.
देशामध्ये लवकरच पहिली ट्रेन सुरू होण्याची शक्यता असून या ट्रेनचे मार्ग देखील आता जवळपास निश्चित करण्यात आलेले आहेत. ही भगव्या रंगाची एक्सप्रेस असून तिचे इंजिन वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर असणार आहे व ते पूर्णपणे भगव्या रंगाचे असणार.
तसेच या ट्रेनच्या कोचेच्या खिडकीच्या वर आणि खाली भगव्या रंगाचा पट्टा असणार आहे. या ट्रेन बद्दल रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाहिले तर ही 22 डब्यांची ट्रेन असणार असून ताशी 130 किलोमीटर इतक्या वेगाने ती धावणार आहे.
या ट्रेनमध्ये स्लीपर आणि जनरल क्लासचे डबे असणार आहेत. अमृत भारत ट्रेनचे निर्मिती ही देशातील कामगार व कष्टकऱ्यांना समोर ठेवून करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे वंदे भारत तसेच शताब्दी व राजधानी एक्सप्रेस धावतात अगदी त्याचप्रमाणे ही ट्रेन देखील ताशी 120 किलोमीटर वेगाने जाऊ शकणार आहे. अमृत भारत ट्रेनचे भाडे हे सामान्य ठेवण्यात येणार आहे.
या मार्गांवर धावेल अमृतभारत ट्रेन
देशातील पहिल्या अमृतभारत ट्रेनचे ट्रायल पूर्ण करण्यात आलेले असून त्याच्यातील पहिली अमृत भारत एक्सप्रेस ही चित्तोडगढ एक्सप्रेस आणि दुसरी तामिळनाडू एक्सप्रेस असणार असून त्यांचे मार्ग देखील जवळपास निश्चित झालेले आहेत. या दोनही राज्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार तसेच पंजाब, महाराष्ट्र, गुजरात आणि झारखंड तसेच दक्षिण भारतातील राज्यांच्या दरम्यान धावणार आहेत.
अमृत भारत ट्रेनमधील पूल पूश तंत्रज्ञान नेमके काय आहे?
या ट्रेनमध्ये पूल पूश तंत्रज्ञान वापरण्यात आलेले असून या तंत्रज्ञानामध्ये ट्रेनच्या दोनही टोकांना इंजिन असते व यामध्ये पुढचे इंजिन ट्रेनला ओढण्याचे काम करते तर या ट्रेनला जे काही मागचे इंजिन असते ते ट्रेनला मागून ढकलायचे काम करते.