पहिल्यांदाच बँकेकडून क्रेडिट कार्ड घ्यायचा विचार सुरू आहे का? क्रेडिट कार्ड घ्या परंतु ‘या’ चुका टाळा; नाहीतर होईल पश्चाताप

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अल्पमुदती करिता कर्ज मिळते व त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला जास्तीचा कालावधी देखील मिळतो. परंतु या कालावधीत तुम्हाला क्रेडिट कार्डचे पैसे भरणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर वेळेमध्ये पैसे भरले तर तुम्हाला घेतलेल्या कर्जावर कुठल्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही.

Published on -

Use Of Credit Card:- सध्या क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून कुठल्याही प्रकारची खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो व त्यासोबत पेट्रोल पंप, मॉल्स किंवा इतर अनेक ठिकाणी क्रेडिट कार्ड आता वापरले जाते. क्रेडिट कार्ड वापरणे म्हणजे ते एक प्रकारे कर्ज घेऊन पैसा वापरण्यासारखेच आहे.

क्रेडिट कार्डच्या माध्यमातून अल्पमुदती करिता कर्ज मिळते व त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला जास्तीचा कालावधी देखील मिळतो. परंतु या कालावधीत तुम्हाला क्रेडिट कार्डचे पैसे भरणे खूप गरजेचे असते. तुम्ही जर वेळेमध्ये पैसे भरले तर तुम्हाला घेतलेल्या कर्जावर कुठल्याही प्रकारचे व्याज द्यावे लागणार नाही.

तसेच क्रेडिट कार्डचे फायदे जर बघितले तर यावर अनेक ऑफर्स असतात तसेच डिस्काउंट आणि रिवार्ड पॉईंट मिळत असतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड खूप कमी कालावधीत मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहे.

परंतु क्रेडिट कार्ड वापरताना काही नियम किंवा काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. जर तुम्ही काही चुका केल्या तर क्रेडिट कार्ड जितके फायद्याचे वाटते तितके ते तुमच्या आर्थिक दृष्टिकोनातून नुकसान देखील करू शकते.

त्यामुळे पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड वापरत असाल तर काही गोष्टी तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही.

 क्रेडिट कार्ड पहिल्यांदाच वापरत असाल तर या चुका टाळा

1- लिमिटच्या 30% पेक्षा जास्त वापरू नका आपल्याला माहित आहे की जेव्हा आपल्याला क्रेडिट कार्ड मिळते तेव्हा त्यावर एक खर्चाचा लिमिट दिलेला असतो. क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर तुम्हाला जी काही क्रेडिट मर्यादा मिळाली असेल त्या मर्यादेच्या 30% पेक्षा जास्त खर्च करू नये किंवा त्या कार्डचा वापर करू नये.

बऱ्याच जणांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करण्याची सवय असते. परंतु बँकेच्या दृष्टिकोनातून अशा मोठ्या प्रमाणात खर्च करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक दृष्ट्या बँक कमकुवत मानते व त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. तसेच तुम्ही क्रेडिट कार्डची जी काही देय रक्कम भरतात तिचे दोन प्रकार असतात.

यातील पहिला प्रकार म्हणजे तुम्ही खर्च केलेली सगळी रक्कम एकाच वेळी भरू शकता. दुसरा प्रकार बघितला तर यामध्ये किमान देय रक्कम भरू शकतात. जर अशा पद्धतीने किमान रक्कम भरत असाल तर तुम्हाला त्याचा एक फायदा असा मिळतो की तुमच्या कार्ड फक्त ब्लॉक केले जात नाही.

परंतु उरलेल्या थकबाकीच्या रकमेवर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर व्याज द्यावे लागेल. विशेष म्हणजे हे व्याज एकूण रकमेवर आकारले जाते. त्यामुळे क्रेडिट कार्डचे पेमेंट करताना ते एकूण देय रक्कम स्वरूपात भरणे गरजेचे आहे.

2- कार्ड अचानक बंद करू नका तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असतील तर अचानक क्रेडिट कार्ड बंद करू नका. जर तुम्ही अचानकपणे क्रेडिट कार्ड बंद केले तर क्रेडिट युटीलायझेशन रेशो वाढण्याची शक्यता असते.

कारण पूर्वी तुमचा क्रेडिट यूटीलायझेशन रेशो दोन कार्डमध्ये विभागला गेला होता. यातील एक कार्ड जर तुम्ही बंद केले तर हा रेशो एकच कार्डमध्ये असेल.

अशाप्रकारे उच्च क्रेडिट वापर गुणोत्तर तुमचा सिबिल स्कोर खराब करू शकते. त्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तरी ते ऍक्टिव्ह ठेवणे गरजेचे आहे.

3- कार्ड वरून रोख रक्कम काढू नका ज्याप्रमाणे एटीएम कार्डचा वापर करून आपण रोख रक्कम काढू शकतो. अगदी त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड वरून देखील रोख रक्कम काढता येते. परंतु यामध्ये किती पैसे तुम्हाला काढता येतील याची एक ठराविक मर्यादा असते.

परंतु तुम्ही जर परत परत क्रेडिट कार्ड वरून रोख रक्कम काढत असाल तर याकरिता तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर शुल्क द्यावे लागते. तसेच अशा पद्धतीने रोख व्यवहारावर म्हणजेच रोख रक्कम काढण्यावर व्याजमुक्त क्रेडिट कालावधीचा कोणताही फायदा मिळत नाही.

जेव्हा आपण क्रेडिट कार्ड घेतो तेव्हा ते विदेशामध्ये वापरण्याकरिता आकर्षक ऑफर दिल्या जातात. परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही दुसऱ्या देशांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला परकीय चलन व्यवहार शुल्क भरावे लागते. त्याऐवजी तुम्ही दुसऱ्या देशात क्रेडिट कार्डचा वापर करण्याऐवजी प्रीपेड कार्डचा वापर केला तर त्याचा फायदा अधिक राहतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News