मित्र हवे तर असे! स्पर्धा परीक्षांसाठी एकत्र कष्ट घेतले आणि मिळवले उत्तुंग यश, वाचा पाच मित्रांची यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आयुष्यामध्ये प्रत्येकाला अगदी लहानपणापासून मित्र असतात व काही व्यक्तींची मैत्री ही बालपणीपासून तर शेवटपर्यंत टिकते. आपल्या एकंदरीत जडणघडणीमध्ये जर विचार केला तर आई-वडिलांचा जितका हात असतो तितकाच आपल्या सामाजिक जीवनातील वागणुकीवर आपल्या सोबत असणाऱ्या मित्रांचा देखील चांगला वाईट प्रभाव पडत असतो.

जर आपण वाईट मित्रांच्या संगतीत राहिलो तर तशाच सवयी आपल्याला देखील लागतात व आपण देखील वाईट मार्गाला जाऊ शकतो व या मुद्द्याला धरून अनेक उदाहरणे आपण समाजात बघितली असतील. परंतु जर सद्गुनी मित्राची साथ राहिली तर माणूस नक्कीच आयुष्यामध्ये यशस्वी होतो हे देखील उदाहरणे आपण समाजात पाहतो.

अगदी याच मैत्रीच्या मुद्द्याला धरून आपण नाशिक जिल्ह्यातील पाच मित्रांचा विचार केला तर ते एकत्र राहिले व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला आणि पाचही जणांनी घवघवीत यश मिळवले. यास पाच मित्रांची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 पाच मित्रांनी एकत्र अभ्यास करत मिळवले यश

याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणहून एकत्र राहत असलेले अनिल भीमराव बत्तीशे, राहुल नानासाहेब पवार तसेच आकाश दीपक बोढारे,  आणि राकेश कैलास निकम आणि शुभम नंदकुमार निकम या पाचही मित्रांनी असे काही करून दाखवले की मैत्रीच्या नात्याला एक नवा चेहरा तर दिलाच परंतु सुसंस्कृत मित्र जर सोबत राहिले तर किती सकारात्मक गोष्टी घडू शकतात याचे देखील उत्तम उदाहरण समाजापुढे घालून दिले.

नाशिक मधील एका अभ्यासिकेमध्ये दिवस रात्र एक करून आणि एकमेकांना मार्गदर्शन  करत स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून त्यांनी घवघवीत यश देखील मिळवले. यापैकी जर आपण आकाश बोधारे याचा विचार केला तर हा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या शिंदे भयाळे गावचा रहिवासी असून त्याचे माध्यमिक शिक्षण शिंदे येथील जनता विद्यालय मध्ये झाले व केटीएचएम कॉलेज नाशिक येथून महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले.

साधारणपणे 2018 पासून तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत आता व यामध्ये त्यांनी अनेक स्पर्धा परीक्षा दिल्या परंतु कधी पूर्व तर कधी मेन्स पर्यंत  पोहोचला परंतु यश त्याला हुलकावणी देत होते. परंतु यावर्षी त्याने एमपीएससीच्या परीक्षेत यश मिळवले व त्याची राज्य कर निरीक्षक आणि मंत्रालय क्लर्क दोन जागांवर निवड झाली असून सर्वत्र त्याचे कौतुक केले जात आहे. तसेच अनिल बत्तीशे हा देखील शिंदे या गावचा असून त्याने देखील आकाश प्रमाणेच शिक्षण घेतले व आकाश सोबत अभ्यास केला.

विशेष म्हणजे आकाश प्रमाणेच अनिल ने देखील दोन परीक्षा उत्तीर्ण केले असून त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक आणि मंत्रालय क्लर्क या दोन पदांचा समावेश असून त्यापैकी एकाची निवड अनिल करणार आहे. या पाच मित्रांपैकी तिसरा हा राहुल पवार निफाड तालुक्यातील करंजगाव येथील असून त्याच्या राहत्या गावी त्याचे प्राथमिक शिक्षण झाले व माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय करंजगाव येथे पूर्ण केले व महाविद्यालय शिक्षण सायखेडा येथील के के वाघ या ठिकाणाहून पूर्ण केले.

गेल्या दोन वर्षापासून राहुलने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली व कष्टाने एम पी एस सी च्या माध्यमातून 2021 आणि 2023 मध्ये मंत्रालय मुंबई येथे निवड झाली आहे. तसेच राकेश निकम आणि शुभम निकम हे दोन्ही मित्र मोहाडी दिंडोरी तालुक्यातील एकाच गावचे रहिवासी असून दोघांचे शिक्षण केआरटी हायस्कूल आणि जुनियर कॉलेज मोहाडी या ठिकाणी झाली असून ओझर येथील मराठा विद्या प्रसारक समाज कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात पदवी पूर्ण केली.

राकेशने देखील दोन पदांची परीक्षा पासआऊट केली असून त्याची निवड मुंबई मंत्रालयामध्ये क्लर्क आणि कर सहाय्य पदासाठी झालेली आहे  व शुभम निकम याची देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मंत्रालय क्लर्क म्हणून निवड झाली आहे. अशा पद्धतीने या पाचही मित्रांनी कष्ट घेऊन आणि सातत्याने अभ्यास आणि एकमेकांना मार्गदर्शन करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उत्तुंग यश मिळवले.

या पाचही मित्रांनी नासिक येथील गंगापूर रोडवर असणाऱ्या अभ्यासिकेमध्ये अभ्यासाला सुरुवात केलेली होती व अभ्यास व परीक्षेच्या बाबतीत असलेल्या अडीअडचणी आणि शंका सोबत बसून ते सोडवत होते व याचाच फायदा त्यांना 2022 आणि 2023 मध्ये झालेल्या परीक्षेत झाला त्यामुळे या पाचही मित्रांच्या उदाहरणावरून दिसून येते की मित्र जर चांगले राहिले आणि एकमेकांच्या साहाय्याने जर त्यांनी काही करायचे ठरवले तर ते हमखास मिळवू शकतात.