थंडगार पाण्याची बाटली विकत घेता परंतु बाटलीच्या झाकणाचा रंग पाहता का? काय होतो झाकणाच्या रंगाचा अर्थ? वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पाणी हे जीवन आहे असे म्हटले जाते. परंतु हेच पाणी सध्या जर आपण पाहिले तर प्रदूषणामुळे पिण्यायोग्य राहिलेले नाही. नदी असो की तलाव यामध्ये अनेक प्रकारचे प्रदूषण होते व पाण्याची शुद्धतेची पातळी दिवसेंदिवस खालावत जात आहे. भारतामध्ये नदी प्रदूषणाच्या समस्याने इतके गंभीर स्वरूप धारण केले आहे की नद्याचे प्रदूषण रोखण्याकरिता पावले देखील उचलावे लागत आहेत.

नद्यांच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे सांडपाणी सोडले गेल्यामुळे प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करत आहे. एवढेच नाही तर आपल्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये जो काही पाणीपुरवठा होतो. त्याठिकाणचे पाणी देखील शुद्ध असते का हा देखील एक मोठा प्रश्न आहे. अनेक मार्गाने पाण्याच्या प्रदूषणाचे प्रमाण वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर शुद्ध पाणी प्यायला मिळावे याकरिता घरामध्ये बरेच जण आता आरोचा वापर करतात.

तसेच प्रवासाच्या दरम्यान पाणी पिण्यासाठी मिनरल्स वॉटरची बाटली विकत घेतली जाते. यामध्ये मिनरल्स वॉटरची बाटली घेतल्यानंतर याच्यातील पाणी शुद्ध असते अशी आपली धारणा असते. कारण प्लांटमध्ये या पाण्यावर व्यवस्थित प्रक्रिया करून त्याच्यातील  अशुद्ध घटक काढून ते शुद्ध केले जाते व पॅकिंग करून विक्रीसाठी उपलब्ध केले जाते.

जर आपण बाजाराचा विचार केला तर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स मिनरल्स वॉटर्स मध्ये उपलब्ध आहेत. या मिनरल्स वॉटर्स कंपन्यांना देखील या उद्योगांमध्ये अनेक प्रकारचे परवाने घ्यावे लागतात व एका निकषानुसार पाण्यावर प्रक्रियेचे काम करावे लागते. परंतु जेव्हा आपण बऱ्याचदा पाण्याची बॉटल घेतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे स्टिकर्स आणि वेगवेगळ्या रंगांची झाकणे असलेल्या बाटल्या दिसतात.

परंतु आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि फक्त मिनरल्स वॉटरची बॉटल आहे म्हणून खरेदी करतो आणि पाणी पितो. परंतु तुम्हाला माहिती आहे का झाकणांचा जो काही वेगवेगळा रंग असतो त्यामागे देखील काही अर्थ लपलेले आहेत. नेमके झाकणाच्या या वेगळ्या रंगांचा अर्थ नेमका काय होतो याबद्दलचेच महत्त्वाची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

 पाण्याच्या बाटली वरील झाकण्याचा रंगाचा अर्थ नेमका काय होतो?

जेव्हा आपण पाण्याची बाटली विकत घेतो तेव्हा आपण त्या बाटलीच्या झाकणाचा रंग नेमका काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. कारण या बाटल्यांच्या झाकणाचा रंग तुम्ही बाटलीतील जे पाणी पिणार आहेत त्या पाण्याबद्दल बरंच काहीतरी सांगत असतो. त्यामुळे झाकणाचा रंग पाहणे व त्या रंगाचा अर्थ समजून घेणे खूप गरजेचे आहे.

1- पांढऱ्या रंगाच्या झाकणाचा काय होतो अर्थ?- तुम्ही पाण्याची बाटली घेतली व त्या बाटलीच्या झाकणाचा रंग जर पांढरा असेल तर याचा अर्थ होतो की बाटलीतील जे काही पाणी आहे त्यावर प्रक्रिया केली गेली आहे व ते प्रोसेस केलेले पाणी आहे.

2- काळ्या रंगाच्या झाकणाचा काय होतो अर्थ?- जर तुम्ही पाण्याची बाटली विकत घेतली व त्या बाटलीच्या झाकणाचा रंग जर काळा असेल तर त्याचा अर्थ होतो की बाटलीतील पाणी हे अल्कलाइन आहे.

3- निळ्या रंगाच्या झाकणाचा काय होतो अर्थ?- तुम्ही पाण्याची बाटली विकत घेतली व त्या बाटलीच्या झाकणाचा रंग जर निळ्या रंगाचा असेल तर याचा अर्थ होतो की बाटलीत असलेले पाणी हे झऱ्यातून गोळा केलेले आहे.

4- हिरव्या झाकणाचा अर्थ काय होतो?- पाण्याची बाटली विकत घेतली व त्या बाटलीच्या झाकणाचा रंग हिरवा असेल तर त्या पाण्यात फ्लेवर मिसळला गेला आहे असा त्याचा अर्थ होतो.

अशाप्रकारे पाण्याची बाटली विकत घेण्याआधी तिच्या झाकणाचा रंग व त्याचा अर्थ जाणून घेऊनच बाटली खरेदी करावी हे महत्त्वाचे आहे.