नुसते साप जरी कोणी म्हटले तरी आपल्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो इतकी सापाबद्दलची भीती आपल्या मनामध्ये ठासून भरलेली आहे. नुसता छोटासा साप देखील आपल्याला डोळ्यांना दिसला तरी आपण पळायला लागतो. सध्या पावसाळा सुरू झाला असून या पावसाच्या दिवसांमध्ये साप दिसण्याच्या किंवा सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडताना दिसतात.
कारण या पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याने बऱ्याचदा सापांची बिळे बुजली जातात व त्यांचा निवारा नष्ट झाल्यामुळे साप बाहेर पडतात व कधीकधी ते अडगळीच्या ठिकाणी किंवा घरात देखील शिरतात. अशावेळी बऱ्याच व्यक्ती हे सापाला मारण्याचा प्रयत्न करतात किंवा हातात काठी वगैरे घेऊन त्याला हाकलण्याचा प्रयत्न करतात.
परंतु कधीकधी ही गोष्ट आपल्या अंगलट येऊ शकते. त्यामुळे साप दिसल्यानंतर अशा काही गोष्टी न केलेल्याच बऱ्या. समजा एखाद्या वेळेस तुम्हाला साप दिसला किंवा घरात साप घुसला तर काय करावे? आपल्याला उमजत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की काही वास असे आहेत की ते वास सापांना सहन होत नाही व असे वासांची मदत जर आपण घेतली तर साप घराच्या आजूबाजूला देखील फिरकणार नाहीत. त्यामुळे अशा कोणत्या वस्तूंचे वास आहेत की ते सापाला सहन होत नाहीत? याबद्दलची माहिती आपण या लेखात करून घेऊ.
या गोष्टींचा वापर करा, साप घराच्या आजूबाजूला देखील नाही फिरकणार
1- कांदा आणि लसूणचा वापर– प्रत्येकाच्या घरामध्ये कांदा आणि लसूण या दोन गोष्टी असतातच. या दोन गोष्टींशिवाय स्वयंपाक पूर्ण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे स्वयंपाक हा कांदा आणि लसूण शिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्याचप्रमाणे या दोन्ही वस्तूंना येणारा उग्र वास हा सापांना सहन होत नाही.
2- पुदिना आणि तुळस– ज्याप्रमाणे कांदा आणि लसूणचा वास सापांना सहन होत नाही. अगदी त्याच पद्धतीने पुदिना आणि तुळस या वनस्पतींचा वास देखील सापांना सहन होत नाही. प्रत्येकाच्या घराच्या समोर तुळस लावण्याचे आपल्याला दिसून येते. सापांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला तुळस आणि पुदिन्याचा वासाचा फायदा होतो.
3- एवढेच नाही तर लिंबूचा रस, विनेगर किंवा दालचिनी या पदार्थांचा वास देखील यामध्ये समाविष्ट आहे. या तिन्ही पदार्थ एकत्र करून जर तुम्ही तेल बनवले व ते घरात जर शिंपडले तर घरात साप येण्याची शक्यता कमी होते.
3- याशिवाय अमोनिया वायूचा वास हा अतिशय उग्र स्वरूपाचा असतो व या अमोनिया वायुचा वास देखील सापांना सहन होत नाही व ते घरापासून लांब जातात.
4- तसेच सापांना गडबड आणि गोंगाटाचा त्रास होतो. सापाचे जी काही ऐकण्याची क्षमता असते त्याचा वापर ते अन्न शोधण्यासाठी करतात. जर एखाद्या वेळेस गडबड गोंगाट झाला तर त्या आवाजाने साप गोंधळून जातात. त्यामुळे घोंगाट किंवा गडबड चा देखील सापांना त्रास होतो.