पावसाळ्यामध्ये कपडे सुकवण्याचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो? फक्त ‘या’ गोष्टी करा आणि झटक्यात कपडे सुकवा

Ajay Patil
Published:

महाराष्ट्र मध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये साधारणपणे पावसाची सारखीच परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे. पाऊस सर्व गोष्टींसाठी खूप आवश्यक असून पावसावरच शेती अवलंबून असल्याने साधारणपणे संपूर्ण राज्याचेच नाहीतर देशाचे आर्थिक गणिते पावसावर अवलंबून असते.

परंतु या पावसाच्या कालावधीमध्ये जीवन जगताना आपल्याला बऱ्याच प्रकारच्या अडचणींना देखील तोंड द्यावे लागते हे देखील तितकच खरे आहे. यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात.परंतु त्या प्रचंड प्रमाणात मानसिक त्रास  देतात. तसे पाहायला गेले तर कुठल्याही गोष्टीला एक चांगली आणि वाईट बाजू असते व तशी ती पावसाला देखील आहे.

पावसामुळे उद्भवणारे इतर छोट्या मोठ्या समस्या पाहिल्या तर त्यामधील या दिवसात येणारी प्रमुख समस्या म्हणजे धुतलेले कपडे वाळवण्याची ही होय. कारण कपडे धुतले म्हणजे आपण सुकवायला टाकतो आणि नेमकाच रिमझिम पाऊस सुरू होतो.

त्यावेळी ते कपडे परत घरात टाकायला लागतात आणि पाऊस बंद झाला की परत बाहेर टाक हा क्रम दिवसभर सुरू होतो. त्यामुळे या समस्येपासून तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल तर आपण या लेखामध्ये काही ट्रिक्स बघणार आहोत. त्या वापरून तुम्ही पावसाच्या कालावधीमध्ये देखील अगदी काही थोड्या कालावधीमध्ये कपडे उत्तमपणे सुकवू शकतात.

 या ट्रिक्स वापरा आणि पावसाळ्यात झटक्यात कपडे सुकवा

1- इस्त्रीचा वापर करावा साधारणपणे प्रत्येकाच्या घरामध्ये इस्त्री असते. परंतु या इस्त्रीचा वापर कोरडे कपड्यांसाठी न करता मुली कपडे वाळवण्यासाठी आपल्याला करता येतो. पावसाळ्यामध्ये कपडे सुकवण्यासाठी तुम्ही इस्त्री वापरणे फायद्याचे ठरते. इस्त्रीचा वापर जर ओल्या कपड्यांवर केला तर ते पटकन सुकतात आणि त्यातील ओलावा दूर होतो. साधारणपणे हा पर्याय तुम्ही जीन्स साठी करू शकतात व हा त्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

2- हेअर ड्रायरचा वापर करणे बऱ्याच घरांमध्ये आपल्याला हेअर ड्रायर असल्याचे दिसून येते व याचा वापर तुम्ही कपडे सुकवण्यासाठी करू शकतात. ड्रायरचा वापर हा कपडे सुकवण्यासाठी खूप महत्त्वाचा असून फायद्याचा देखील आहे.

3- वॉशिंग मशीन ड्रायर पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला कपडे सुकवायचे असतील तर तुम्ही घरात असलेल्या वाशिंग मशीनच्या ड्रायरचा वेळ थोडा वाढवून घ्यावा. म्हणजे तुम्ही जर साधारणपणे दोन मिनिटांसाठी ड्रायरचा वापर करत असाल तर तो पाच मिनिटांसाठी करून घ्यावा व त्यानंतर ते कपडे पंख्याखाली ठेवावे. हा पर्याय केल्यामुळे देखील चांगला फायदा मिळतो.

4- हिटरचा वापर करणे पावसाळ्यामध्ये ओली कपडे सुकवण्याकरिता तुम्ही हिटर किंवा ब्लोअरचा वापर चांगला करू शकतात. यासाठी तुम्ही ओल्या कपड्यांमधील पाणी व्यवस्थित काढून टाकावे आणि हिटर किंवा ब्लोअर जवळ कपड्यांना ठेवावे. या पर्यायाने देखील कपडे लवकर सुकतात.

5- कुलरचा वापर करणे  थंडावा देण्याव्यतिरिक्त कुलरचा वापर तुम्ही कपडे वाळवण्यासाठी करू शकतात. या पर्यायांमध्ये तुम्हाला एका स्टॅंडवर कपडे ठेवावे लागतील व समोर कुलर चालू करावा लागेल. यामध्ये लक्षात घ्यावे की कुलरचा पाण्याचा पंप यावेळी बंद ठेवावा. कलरच्या हवेने कपडे लवकर सुकतात.

6- कपड्यांसाठी स्टॅन्डचा वापर करणे तुम्ही जर पावसाळ्यामध्ये कपडे सुखवत टाकण्यासाठी चांगली डिझाईन केलेले स्टॅन्ड आणि रॅकचा वापर केला तरी देखील पटकन कपडे सुकण्यास मदत होते व अशा पद्धतीने यांचा स्टॅन्ड किंवा रॅक तुम्ही पंख्याखाली ठेवून कपडे पटकन सुकवू शकतात.

7- गरम पाण्याचे पातेले वापरणे विद्युत उपकरणा ऐवजी तुम्ही कपडे सुकवण्यासाठी गरम पाणी भरलेल्या पातेल्याचा वापर करू शकतात. याकरिता एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळून घ्यावे व पाण्याचे पातेले चांगले तापले की ते ओल्या कपड्यांवर ठेवावे. त्यामुळे देखील कपडे पटकन सुकण्यास मदत होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe